Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाउंडेशन व LCCIA जळगाव तर्फे “लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो” चे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

गोदावरी फाउंडेशनतर्फे ३ दिवस मोफत आरोग्य तपासणीचाही समावेश

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाउंडेशन व लेवा चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज & ऍग्रीकल्चर ( LCCIA ) जळगाव यांच्या वतीने शुक्रवार दि. ३०/९/ ते रविवार २/१० /२०२२ या कालावधीत स्व. बॅरिस्टर निकम चौक ,सागर पार्क येथे सकाळी १० ते रात्री ९ — रोजी ” लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो ” या व्यवसाय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये ऑटोमोबाइल्स ,ट्रॅक्टर्स , मॅन्युफ्रॅक्चरर्स ,सोलर, कृषी, बचतगट ,पेंट्स, होम डेकोर ,फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स ,होम अप्लायन्सेस ,होम ऍप्लिकेबल , एफएमसीजी प्रोडक्ट्स, फूड मॅन्युफॅक्चरिंग ,बिल्डर्स ,काँट्रॅक्टर्स ,लँड डेव्हलपर्स इत्यादी उत्पादने उद्योग -व्यवसाय व सेवांविषयीचे अनेक खरेदीसुलभ स्टॉल्स राहणार आहेत तीन दिवस चालणाऱ्या या बिजनेस एक्स्पो मध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुंबई-पुण्याच्या ब्रॅण्ड्स सोबतच ग्रामीण भागातील उद्योजकांची उत्पादने व कलाकुसरही अनुभवायला मिळणार आहे.

यासोबतच प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांचा अनुभव अधिक आनंददायी व्हावा यासाठी प्रदर्शनीपरिसरातच खवय्यांसाठी खास विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असलेली ‘ खाऊगल्ली ‘ असेल व याठिकाणी खाद्यपदार्थांची अनेक दुकाने थाटलेली असतील . याशिवाय नागरिकांबरोबर आलेल्या लहान- लहान बालकांच्या मनोरंजनासाठी त्यांना खेळण्याकरिता आकर्षक ‘ किड्स झोन ‘ देखील असेल . याठिकाणी मुले खेळण्याचा आनंद लुटू शकतील . शिवाय या तीन दिवसात देशभक्तीपर गायन व नृत्य , भारूड ,वह्या , ओव्या व अभंग गायन , बहिणाबाईंच्या कवितांवर स्पर्धा , पथनाट्य इत्यादींच्या माध्यमातून खान्देशच्या संस्कृतीचे दर्शनही घडणार आहे.

या ” लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो ” चे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य व आकर्षण म्हणजे या प्रदर्शनीत गोदावरी फाउंडेशनच्या वतीने प्रदर्शनीला भेट देणाऱ्या इच्छुक नागरिकांसाठी तीनही दिवसमोफत आरोग्य तपासणीची सुविधा देखील करण्यात आलेली आहे. या शिबिरात BMI, BP , ECG,BSL, इत्यादींसह २-डी इको पर्यंतच्या टेस्टही मोफत केल्या जाणार आहेत. म्हणजेच ही प्रदर्शनी म्हणजे खरेदीच्या आनंदसोबतच आरोग्याचा मोफत आढावाही असणार आहे. प्रदर्शनाला भेट द्यावीच याचे एक आणखी आकर्षण म्हणजे येथे भेट देणाऱया नागरिकांमधून लकी ड्रॉ काढला जाणार असून, महिलांसाठी खास दर तासाला लकी ड्रॉ काढला जाणार आहे.

विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत . गोदावरी फाउंडेशन हे या एक्सपोचे मुख्य प्रायोजक असून ,वेगा केमिकल्स प्रा.लि. ,सुदर्शन पेपर &प्रॉडक्ट्स , मधुस्नेह परिवार , चौधरी टोयोटा , खान्देश कॉलेज एज्यु . सोसायटी , व दि जळगाव पीपल्स को . ऑप. बँक हे सहप्रायोजक आहेत . तर चॅनल पार्टनर म्हणून खोशाल गृप ,सोनी एजन्सीज ,कृष्णा पेक्टिन्स प्रा. लि . , स्टार फॅब्रिकेटर्स ,जीवनज्योती कॅन्सर हॉस्पिटल जळगाव इ.चे सहकार्य लाभले आहे. जळगावात प्रथमच होत असलेल्या या विविध वैशिष्ट्येपूर्ण . ” लेवा पाटीदार बिजनेस एक्स्पो ” ला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन उद्योजकांना प्रेरणा द्यावी व आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे, सदर पत्रकार परिषदेत माहिती देतांना नितिन इंगळे, चंदन अत्तरदे, बिपीन पाटील, भुषण बढे, चंदन अत्तरदे, महेश चौधरी, ॲड पुष्कर नेहते, रुपेश सरोदे, हितेंद्र धांडे, अभिजित महाजन उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यास होतात दुष्परिणाम

Next Post

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव तर्फे नेशन बिल्डर अवार्ड

Next Post

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी संगम चाळीसगाव तर्फे नेशन बिल्डर अवार्ड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo