Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2019
in लैंगिक शिक्षण
Reading Time: 1 min read
लैंगिक शिक्षण – र. धों. कर्वे

प्रत्येक गोष्टीला कट्टर विरोध करणारे लोक प्रत्येक क्षेत्रात असतातच आणि ज्यांना लैंगिक शिक्षणच मिळालेले नसते, त्यांना लैंगिक गोष्टी गलिच्छ वाटणारच. हे विचारात घेतले, तर अशा लोकांना मुलांना लैंगिक शिक्षण देण्याची कल्पना पचणेच शक्य नाही, याचे आश्चर्य वाटायला नको. या बाबतीत काही वर्षापूर्वी शिक्षकांच्या एका गटाशी बोलण्याचा योग आम्हांस आला. त्या वेळी आम्ही त्यांस सांगितले की, मुळे तीन वर्षाची झाली की, आपल्या जन्माविषयी प्रश्न विचारू लागतात. एक शिक्षक आमच्या विधानाला विरोध करत म्हणाला, “माझा मुलगा मला असले प्रश्न कधीच विचारीत नाही.” आम्ही त्यावर असे सुचविले की, “ठीक आहे,तुम्हास विचारीत नसेल तुमच्या आईस विचारीत असेल.” यावर तो शिक्षक कडाडला, “त्याच्या आईला असले प्रश्न विचारण्याची छातीच होणार नाही..” असं खाक्या असल्यानंतर कोण मुलगा तोंड उघडण्याचे धाडस करील?

आपल्या तोंडाला लगेच कुलूप ठोकले जाईल आणि पाठीवर रट्टे बसतील ही कल्पना असल्याने तो माहिती मिळवण्याचे अन्य मार्ग शोधायला लागतो.

पालकांना आपल्या मुलांना लैंगिक विषयांचे मुळीच ज्ञान नाही, असे नेहमी वाटत असते. पण त्यांची मुलेच काय पण मुलीसुद्धा लैंगिक बाबतीत फारच रस घेत असतात, हे त्यांना माहित नसते. लैंगिक बाबतीतले मुलांचे कुतूहल दडपून टाकणे किंवा खोटेनाटे सांगून चुकीचे ग्रह करून देणे यापासून वाईट परिणाम तर होतातच; पण शरीराच्या आरोग्याबद्दलचे शिक्षण लैंगिक अवयवांचे ज्ञान दिल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की शरीराचे आरोग्य, नैतिकता आणि धार्मिकता यांच्यात सरभेसळ करता कामा नये. माणसाच्या देहाला देवाचे मंदिर समाजणे जितके घटक आहे तितकेच देहाच्या काही इंद्रियांना गलिच्छ समाजाने घातक आहे. लैंगिक ज्ञानाला गलिच्छ म्हणून किंवा धार्मिक कारणासाठी निषिद्ध मानणे, या एकाच मनोवृत्तीच्या दोन बाजू आहेत. शरीराच्या अन्य इंद्रियांबद्दल आपण जशी वागणूक ठेवतो, तशीच वागणूक लैंगिक इंद्रियांबद्दल ठेवली पाहिजे. शिष्टाचार म्हणून चारचौघांसमोर असे मोकळेपणाने बोलणे सहसा टाळले जाते, हेही येथे नमूद करून ठेवायला पाहिजे.

प्रौढांना देखील लैंगिक शिक्षण दिले गेले पाहिजे. त्यांनाच त्याची जास्त गरज आहे. प्रौढ लोक आपले चुकीचे ज्ञान मुलांवर लादतात आणि त्यांच्या मनात लैंगिक अवयवांविषयी घृणा निर्माण करतात. मुलांना वय वाढत जाऊन प्रौढत्व प्राप्त होईपर्यंत आपल्या शरीरात कसेकसे बदल होत जाणार आहेत, याची पूर्वकल्पना आधीपासूनच यायला हवी. नैसर्गिक सत्याचे ज्ञान हे निसर्ग नियमाप्रमाणे मिळत गेल्यास लैगिक जीवनात विष कालवणारी सोंगेढोंगे आपोआपच नष्ट होतील.

‘स्रोत – तथापि ट्रस्ट निर्मित Let’s Talk Sexuality 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लैंगिकतेबद्दल का बोलायचं?

Next Post

मासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज

Next Post
मासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज

मासिक पाळीविषयी मनमोकळ्या संवादाची गरज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo