Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊन काळात सायबर संदर्भात ४६१ गुन्हे दाखल ; २५० लोकांना अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लॉकडाऊन काळात सायबर संदर्भात ४६१ गुन्हे दाखल ; २५० लोकांना अटक

नांदेड येथे नवीन गुन्ह्याची नोंद

मुंबई, दि.७ – लॉकडाऊन काळात राज्यात काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४६१ गुन्हे दाखल झाले असून २५० व्यक्तींना अटक केल्याची  माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

Maha Info Corona Website

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ०६ जून २०२० पर्यंत एकूण ४६१ गुन्ह्यांची (ज्यापैकी २८ N.C आहेत) नोंद झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने विश्लेषण केले असता, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९२, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८५, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३, ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४, तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स,युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत २५० आरोपींना अटक केली आहे. यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात यश आले आहे.

नांदेड

नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या १३ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीला  धार्मिकतेचा रंग देणाऱ्या आशयाची पोस्ट आपल्या व्हाट्सॲप वरून विविध ग्रुप्सवर टाकली होती त्यामुळे परिसरामध्ये शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

चुकीच्या मेसेज पासून सावधान

महाराष्ट्र सायबरने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपणास कोणी अपरिचित व्यक्तीने किंवा आपण ज्या व्हाट्सॲप ग्रुप्सवर आहात त्यावरील परिचित किंवा अपरिचित व्यक्तीने असे व्हिडिओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स ज्यामुळे धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होऊ शकते, असे मेसेज पाठवत असल्यास तत्काळ त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये द्यावी. तसेच आपण असे व्हिडिओ, फोटोज, मेसेजेस किंवा अन्य काही पोस्ट्स कोणालाही पाठवू नयेत त्या त्वरित डिलिट कराव्यात . व्हाट्सॲप ग्रुपचे निर्माते (owner) किंवा ॲडमिन असणाऱ्यांनी चुकीच्या पोस्ट्स अथवा अफवा पसरवणारे मेसेजेस व व्हिडिओ ग्रुपवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी तसे न केल्यास व्हाट्सॲप ग्रुप निर्माते व ॲडमिन यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्यासाठी group सेटिंग मध्ये only admin असे setting करावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

१० लाख ७८ हजार १२१ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

Next Post

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

Next Post
राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d