Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊनच्या काळात ४६२ सायबर गुन्हे दाखल; २५४ जणांना अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
लॉकडाऊनच्या काळात ४६२ सायबर गुन्हे दाखल; २५४ जणांना अटक

मुंबई दि.८- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने  कठोर पावले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४६२  गुन्हे दाखल झाले असून २५४ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९२ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८६  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५४ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे .

पुणे शहरामध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे  . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीला राजकीय रंग असणाऱ्या आशयाची पोस्ट शेअर केली होती ,त्यामुळे परिसरातील वातावरण बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. 

सध्या कोरोना महामारीच्या काळात व्हाट्सअपवर तसेच अन्य सोशल मिडियावर कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे व अन्य माहिती प्रसारित होत आहे . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना अशी विनंती करते की कृपया तुम्हाला अशा आशयाच्या पोस्ट्स आल्या तर आपण त्या पोस्ट्स पुढे पाठवू नये .रुग्णांची माहिती अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला फॉरवर्ड करत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे करण्यापासून परावृत्त  करा . तुम्ही व्हाट्सअप ऍडमिन किंवा निर्माते (group creator )असाल आणि जर कोणी अशी माहिती पाठवत असेल तर तात्काळ सदर ग्रुप सदस्याची त्या ग्रुपवरून हकालपट्टी करावी आणि ग्रुप सेटिंग ‘only admin ‘ असे करावे . कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती अशा प्रकारे प्रसिद्ध करणे हा कायदेशीर गुन्हा आहे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात आज ५६ कोरोना बाधित रूग्ण आढळले;संख्या ११६५ इतकी झाली

Next Post

मान्सून काळातील संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयंत पाटील

Next Post
मान्सून काळातील संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयंत पाटील

मान्सून काळातील संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज – पालकमंत्री जयंत पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo