Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लॉकडाऊनमुळे पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या खाडी जमिनीवरील मीठ उत्पादनावर परिणाम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
लॉकडाऊनमुळे पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या खाडी जमिनीवरील मीठ उत्पादनावर परिणाम

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले 

लॉकडाऊनमुळे पूर्व द्रुतगती महामार्गालगत विक्रोळी ते मुलुंड पर्यंत पसरलेल्या मिठागर जमिनीवर मीठ उत्पादन व प्रक्रियाचे काम करणारे मजूर घरी परत गेल्याने येथे मोठ्या प्रमाणात मिठाचे ढिगारे जमा झाले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. पाऊस यायच्या आधी जर हे जमा झालेले मीठ ट्रकमध्ये भरून पुढील प्रक्रियेसाठी पाठविले नाही तर मीठ वाहून जाऊन खूप मोठे नुकसान होवून भविष्यात देशात मिठाची कमतरता भासू शकते.

पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या विक्रोळी ते मुलुंडपर्यंत पसरलेल्या खाडी जमिनीवर मीठ उत्पादन करण्यासाठी अनेक मजूर कार्यरत असतात त्यामुळे मिठाचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात येथून निघते. जर लॉकडाऊन अश्याच पद्धतीने वाढत गेला तर येणाऱ्या काळात मिठाची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुलुंड येथील मिठागरे सांभाळणारे सुभाष पाटकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की पूर्वी शेकडो मजूर होते व ते मिठागरातील जमिनीवर  असलेल्या घरात राहायचे परंतु लॉकडाऊन मुळे हे सर्व मजूर आपआपल्या गावी गेले असल्याने फ़क्त १५ मजूर सध्या उरले असून एवढ्या कमी मजुरांमध्ये येथील मीठ उत्पादन व प्रक्रियेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे त्यामुळे मिठाचे मोठे ढिगारे येथे जमा झालेले दिसत आहेत. सध्या ट्रकमध्ये भरून पुढील प्रक्रियेसाठी मीठ पाठविण्याची आवश्यकता आहे परंतु मजुरांची संख्या खूपच कमी असल्याने उपलब्ध मजुरांद्वारे येथील सर्व कामे केली जात आहे व ट्रकमध्ये मीठ भरले जात आहे.  पाऊस यायच्या आधी येथील मीठ ट्रकमध्ये भरून पुढील प्रक्रियेसाठी नाही पाठविले तर जमा झालेले सर्व मीठ वाहून जाईन व अश्याने आमचे तसेच सरकारचे देखील मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे व हिच परिस्थिती भारतात सर्वत्र असल्यामुळे भविष्यात भारतात मिठाची कमतरता भासू शकते, असे सुभाष पाटकर यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

Next Post
जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d