Wednesday, August 26, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधत सहा महत्त्वपूर्ण विषयांवर विधी सहाय्यक किशोर डोंगरे यांचे मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/08/2026
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

लोहारा या.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

ग्रामीण भागातील नागरिकांना कायदे विषयक माहिती मिळावी, त्यांच्या मूलभूत व संविधानिक हक्कां बाबत जनजागृती व्हावी तसेच गरजू नागरिकांना उपलब्ध असलेल्या विधी सेवा व विविध योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने तालुका विधी सेवा समिती, पाचोरा आणि श्री तपेश्वर ज्येष्ठ नागरिक मंडळ, लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा येथे आयोजित कायदे विषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न झाले.

शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ज्येष्ठ नागरिक अभ्यासिका हॉल, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, लोहारा, ता. पाचोरा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयोजित या उपक्रमात पाचोरा न्यायालयातील विधी सहाय्यक श्री. किशोर डोंगरे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांना विविध कायदे विषयक विषयांवर मार्गदर्शन केले.

सहा महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन

शिबिरात राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (२१ ऑगस्ट), नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, वैकल्पिक वाद निवारण पद्धती (ADR) व त्याचे फायदे, मानसिक आजार व बौद्धिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींसाठी NALSA Legal Services Scheme, 2024, मानव-वन्यजीव संघर्षातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी NALSA Scheme, 2025 तसेच गरिबी निर्मूलनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी NALSA Scheme, 2015 या सहा महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

विधी सहाय्यक किशोर डोंगरे यांनी ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर अधिकार, नागरिकांची घटनात्मक कर्तव्ये, वाद न्यायालयात न नेता सामोपचाराने सोडविण्याच्या ADR पद्धतीचे महत्त्व तसेच गरजू व वंचित नागरिकांना उपलब्ध असलेल्या विधी सहाय्याची माहिती दिली.

ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक हक्कांची जाणीव!

ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहणे गरजेचे असून, कोणत्याही कायदेशीर अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध असलेल्या विधी सेवा यंत्रणेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकां पर्यंत कायदे विषयक माहिती पोहोचविण्यासाठी अशा जनजागृती शिबिरांची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तपेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित!

या कार्यक्रमास तपेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भास्कर अंबीकर, सचिव बाबुलाल बोऱसे, बाबुलाल सुतार, प्रभाकर चौधरी, ईश्वर परदेशी, अ. अ. पटेल, अमृत चौधरी, श्रावण चौधरी, मंगलदास मोरे, अॅड. एस. एस. गीते, रमेश पालीवाल, श्रावण चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, कडुबा चौधरी, आशा काळे, चंद्रकला भडके, चंद्रभागा चौधरी आणि श्रीराम कलाल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभिमान बाविस्कर सामाजिक कार्यकर्ता यांनी परिश्रम घेतले.

तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात कायदे विषयक जनजागृतीचा उपक्रम राबवून नागरिकांना त्यांच्या हक्कांची व उपलब्ध विधी सहाय्याची माहिती देण्यात येत असल्याने या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. “न्याय सर्वांसाठी” या संकल्पने नुसार कायदेविषयक माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.यावेळी सुत्रसंचलन श्रीराम कलाल यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

Next Post

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

Next Post
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

लोहारा येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न!!

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo