Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वडिलांच्या संपत्तीवर मुला-मुलींचा हक्क किती? काय म्हणतो कायदा?जाणून घ्या सविस्तर…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/09/2022
in विशेष
Reading Time: 1 min read

वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. अनेकदा हे वाद अगदी न्यायालयापर्यंत पोहचतात. अशावेळी न्यायालये काय निवाडा देतात यावर अनेक गोष्टी ठरतात. अशाच एका खटल्यावर सुनावणी करताना वडील हयात असोत किंवा नसो, मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.

आपल्या देशात वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्कासंबंधीच्या तरतुदींबद्दल अनेक लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. विशेषत: महिलांना याची जाणीव कमी असते. या मालमत्तेशी त्यांचा काहीही संबंध नाही असे अनेक महिला गृहीत धरतात. याशिवाय सर्व सामाजिक परंपरांमुळे मुलींना वडिलांच्या मालमत्तेतील हक्कापासून वंचित ठेवले जाते. येथे आम्ही तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीवर मुला-मुलींचा हक्क किती? याबाबत सांगणार आहोत.

मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क:- पूर्वी समाजामध्ये वडिलांच्या संपत्तीचा वारसदार हा मुलगाच मानला जातो. हिंदू कुटुंबांमध्ये मुलगा हाच घराचा कर्ता मानला जात असल्यामुळे 2005 आधी कायदा तसा होता. 2005 मध्ये या कायद्यात सुधारणा झाली, त्यानुसार मुलाचा आणि मुलीचा संपत्तीवर समान हक्क आहे असे सांगण्यात आले.

हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समाजाला हा कायदा
लागू:- या कायद्याचे नियम फक्त हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या समाजालाच लागू होतील असे या कायद्यामध्ये सांगण्यात आले आहे.

वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे काय?:-

कोणत्याही पुरुषाला आपल्या वडिलांकडून, आजोबाकडून किंवा पणजोबांकडून जी संपत्ती प्राप्त होते त्याला वडिलोपार्जित संपत्ती म्हणतात. जन्मानंतर त्या मुलाचा वडिलोपार्जित संपत्तीवर हक्क स्थापित होतो.

वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पत्नीचा हक्क:-

वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पत्नीचा समान वाटा असतो. जसे कि जर कुटुंबामध्ये तीन मुलं असतील तर तिन्ही मुलांना आपल्या वारसाहक्काप्रमाणे एक तृतियांश संपत्ती मिळेल आणि त्यांच्या मुलांमध्ये आणि पत्नीमध्ये संपत्तीची समान विभागणी होईल.

मुस्लीम समाजामध्ये वाटणी कशी होते?:- मुस्लीम समाजामध्ये हिंदू समाजापेक्षा वाटणीची पद्धत जरा वेगळी आहे जसे कि जोपर्यंत त्या पिढीची अंतिम व्यक्ती जिवंत असते, तोपर्यंत त्या संपत्तीची वाटणी होत नाही.

वडिलोपार्जित संपत्ती विकण्याचे नियम पुढीलप्रमाणे:- जर आपल्याला आपली वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर त्याचे नियम खूप कडक आहेत, कारण या संपत्तीमध्ये अनेक हिस्सेदार असतात. त्यामुळे विकताना अनेक अडचणी येतात.

स्वतःच्या मर्जीने संपत्ती विकू शकत नाही:- जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी जर झाली नसेल तर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ती स्वत:च्या मर्जीने विकू शकत नाही.

कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणे गरजेचे:- जर वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर कुटुंबातल्या सर्व सदस्यांची सहमती असणं आवश्यक आहे. जर संपत्ती विकण्यास सहमती नसेल तर ती संपत्ती आपण विकू शकत नाही.

दुसऱ्या पत्नीचा वडिलोपार्जित संपत्तीवर अधिकार
असतो का?:- हिंदू विवाह कायद्यानुसार दोन लग्न करण्याची परवानगी पुरुषांना नसते. जर पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर दुसरं लग्न झालं असेल तर ते लग्न कायदेशीर मानलं जातं. अशा स्थितीत दुसऱ्या पत्नीच्या मुलांचा त्या व्यक्तीच्या संपत्तीवर हक्क असतो, पण त्या व्यक्तीला वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीवर त्यांचा हक्क नसतो.

कमावलेल्या संपत्तीवर कुणाचा हक्क असतो?:- जर तुमची संपत्ती वडिलोपार्जित नसेल, म्हणजेच ती तुम्हीच मेहनतीने कमावलेली असेल तर त्या संपत्तीची वाटणी कशी करायची, याचा सर्वस्वी अधिकार तुमचाच आहे. तुमच्या जिवंतपणी किंवा तुमच्या पश्चात ती संपत्ती तुम्ही कुणाच्याही नावे करू शकता.

जर मृत्युपत्र नसेल तर कायदा काय सांगतो?:– यामध्ये वारसाहक्काने मिळालेली संपत्ती वगळता, जी तुम्ही कमवलेली संपत्ती आहे, त्या संपत्तीवर पत्नी आणि मुलांचा हक्क असतो. जर त्या व्यक्तीचे आई-वडील जिवंत असतील आणि ते देखील त्यांच्यावर उपजिविकेसाठी निर्भर असतील तर त्यांना देखील त्यातून हिस्सा मिळतो.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड.शहेबाज शेख यांना पितृशोक

Next Post

जळगाव जिल्हा-परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांना अपहार व फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

Next Post

जळगाव जिल्हा-परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्कर जगन्नाथ पाटील यांना अपहार व फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo