Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वरणगाव शहरात लॉक डाऊनच्या काळात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करा- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महावितरणचे सहायक अभियांतांना दिले निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
वरणगाव शहरात लॉक डाऊनच्या काळात वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करा- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महावितरणचे सहायक अभियांतांना दिले निवेदन

वरणगाव – लॉक डाऊनच्या काळात गेल्या आठ ते दहा दिवसापासून वरणगाव शहरासह परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा आणि रात्री-बेरात्री खंडित होणारा वीज पुरवठा त्वरित सुरडीत करावा, या मागणीचे निवेदन आज 2 मे रोजी येथील महावितरणचे सहायक अभियंता अखिलेश कुशवाह यांना शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आले.

निवेदनावर नमुद करण्यात आले आहे की, संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्गने हाहाकार माजवला आहे. संसर्ग थांबवण्यासाठी राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमध्ये वरणगावसह परिसरात दिवसा, रात्री बेरात्री केव्हाही वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या तीव्र उन्हाळा असल्याने नागरिकांना वीज खंडीत झाल्यावर घराबाहेर पडल्याशिवाय पर्याय नसतो. नागरिक घराबाहेर निघाल्यावर पोलीस दंडुके मारतात. तसेच मुस्लिम समाज बांधवांचा रमजान महिना सुरु आहे. अशा वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमुद केले आहे.
आम्ही दिलेल्या निवेदनाचा विचार करून वीज पुरवठा सुरडीत करण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने राष्ट्रवादी आंदोलन करेल असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

निवेदनावर राष्ट्रवादीचे न.पा.गटनेते नगरसेवक राजेंद्र विश्वनाथ चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक हरी मराठे, शहराध्यक्ष संतोष बळीराम माळी, नगरसेवक विष्णू नेमीचंद खोले, गणेश सुपडु चौधरी, रवींद्र शांताराम सोनवणे,साजिद कुरेशी अल्पसंख्यांक जिल्हा संघटक पप्पू जकातदार, शेख फराज, शेख रीजवान, इद्रिस खान, माजी ग्रा. प. सदस्य प्रकाश नारखेडे, राजेश पंडित चौधरी, ओबीसी तालुकाध्यक्ष गजानन वंजारी, शेख एहसान, पवन मराठे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मे रोजी एक दिवसाचा जनता कर्फ्यु – जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे

Next Post

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३४१ गुन्हे दाखल

Next Post
लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३४१ गुन्हे दाखल

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ३४१ गुन्हे दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo