Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विकास सर्वसमावेशक व चौफेर असावा -मुख्यमंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
विकास सर्वसमावेशक व चौफेर असावा -मुख्यमंत्री

ठाणे(जिमाका)- सुदृढ आरोग्यासाठी ज्याप्रमाणे चौरस आहार आवश्यक असतो, त्याप्रमाणेच विकाससुद्धा चौफेर आणि सर्वसमावेशक असावा, भविष्यातील गरजा ओळखून विकास कामांचे नियोजन करताना होणारी कामे ही सुबक, दर्जेदार आणि देखणी असावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

सिडकोच्यावतीने आयोजित केलेल्या एकदिवशीय सिडको इन्व्हेस्टमेन्ट ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर समिट (आभासी-व्हर्च्युअल) चा शुभारंभ व सिडकोने उभारलेल्या कळंबोली आणि कांजूरमार्ग येथील कोविड आरोग्य केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, रायगडच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, खासदार श्रीरंग बारणे, खासदार मनोज कोटक, आमदार सर्वश्री बाळाराम पाटील, प्रशांत ठाकूर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे आदी मान्यवर डिजिटल माध्यमाद्वारे उपस्थित होते.

जनतेचे आशीर्वाद मिळवणारे कार्यक्रम- सिडकोने केलेल्या कामाचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आज आपण उपस्थिती लावलेले दोन्ही कार्यक्रम हे जनतेचे आशीर्वाद मिळवणारे कार्यक्रम आहेत. ठाण्यात टेंभीनाका येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रक्तदान सप्ताह असो किंवा आजच्या समर्पित कोविड केंद्राच्या उदघाटनाचा कार्यक्रम. या दोन्ही कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी व्यक्त झाली आहे.

सिडकोनेही अत्याधुनिक व अप्रतिम सुविधा असलेल्या दोन कोविड आरोग्य केंद्राचे आज लोकार्पण झाले आहे. ही दोन्ही केंद्रे स्वच्छ, आखीव-रेखीव व सर्व सुविधायुक्त आहेत. कोविड काळात महाराष्ट्रात जेवढ्या आरोग्य सुविधा निर्माण झाल्या त्या जगात इतर कुठेही झाल्या नसतील. ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

सिडकोच्या प्रकल्पांमुळे अर्थव्यवस्थेला चालना – एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबईत उद्योग, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा वाव आहे. सिडकोने एक आदर्श शहर म्हणून नवी मुंबई उभारले आहे. सुंदर रस्ते, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, क्रीडागंणे या सुविधा उभारल्या आहेत. त्याचबरोबर अल्प व मध्यम उत्पन्नाच्या नागरिकांसाठी निवारा देण्याचे कामही सिडको करत आहे.

सिडकोच्या माध्यमातून होणाऱ्या प्रकल्पामुळे नवी मुंबई, मुंबई व रायगडमध्ये अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.राज्यातील रस्ते दर्जेदार व्हावेत, यासाठी राज्य शासनाने सिमेंटचे रस्ते उभारण्याचे ठरविले आहे. महामुंबई क्षेत्रातील रस्तेही चांगले करण्याचे काम सुरू आहे. रस्ते, पायाभूत सुविधा यांचा विकासात महत्त्वाचे स्थान आहे. मुंबई गोवा ग्रीनफिल्ड महामार्ग, पुणे रिंगरोड अशा प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात रस्त्यांचे जाळे विणून विकासाच्या दिशेन वाटचाल करत आहोत.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाआरोग्य तपासणी शिबिरात ३५० रुग्णांची नोंदणी; उद्यापासून होणार शस्त्रक्रियांना सुरुवात

Next Post

मानधन तत्वावर अनुवादकांनी अर्ज करावेत; भाषा संचालनालयाकडून आवाहन

Next Post
मानधन तत्वावर अनुवादकांनी अर्ज करावेत; भाषा संचालनालयाकडून आवाहन

मानधन तत्वावर अनुवादकांनी अर्ज करावेत; भाषा संचालनालयाकडून आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d