Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

वर्धा,दि.7 जुलै (जिमाका):- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सर्वत्र रोजगार बंद पडले असून सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम नाही. त्यातच वीजबिल जास्त आले आहे. नागरिकांच्या वीज बिलासंदर्भातील समस्या जाणून घेऊन लॉकडाऊनच्या काळातील 3 महिन्याचे वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्यावी, तसेच एकरकमी बिल भरणाऱ्यांना 2 टक्के सूट देण्यात यावी अशा सूचना  राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणला दिल्यात. ते वर्धा  जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विज बिलासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी संदर्भात  शिववैभव सभागृह येथे बैठक पार पडली.

Maha Info Corona Website

या बैठकीमध्ये उद्योगांना होणाऱ्या वीज पुरवठा आणि येत असलेल्या अडचणी, वीज देयक, स्थानिक मुलांच्या रोजगाराचा प्रश्न, दुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या शिक्षण संदर्भातील प्रश्न व जिल्ह्यातील इतर समस्या बाबत निवेदने सादर करण्यात आली.

यावेळी श्री. तनपुरे यांनी शेतकऱ्यांना दिवसा स्वस्त दरात वीज मिळावी तसेच सर्वसामान्य ग्राहकाला व समाजातील  शेवटच्या माणसाला वीज देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे सांगून कोरोनामुळे  लॉकडाऊनच्या काळात मीटर रिडींग घेणे शक्य नव्हते. त्यामुळे नागरिकांना सरासरी वीज बिल पाठविण्यात आले. रीडिंग झाले नसल्यास प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर  विज बिल कमी करण्यात येईल. महावितरणने सरासरी वीज बिल पाठवले असले तरी नागरिकांकडून सक्तीने वसुली केलेली नाही. कोणत्याही ग्राहकाकडून सक्तीने वसुली केली जाणार नाही असेही त्यांनी या वेळी उपस्थित नागरिकांना सांगितले.

महावितरणने नागरिकांना वीज बिलाची संपूर्ण माहिती देऊन वीज विषयक समस्या व शंकांचे संपूर्ण समाधान करावे.तसेच ग्राहकांनी वीज बिल तपासून घ्यावे आणि शंका असल्यास नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून समस्येचे निवारण करावे असे आवाहन यावेळी केले. महावितरणने यासाठी कंट्रोल रूम तयार करून त्याचा टोल फ्री क्रमांक जनतेपर्यंत पोहोचवावा आणि लोकांचे समाधान करावे असेही सांगितले. 1 एप्रिलपासून वीजदारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकाना वीज बिल जास्त दिले असे वाटत असल्यामुळे  त्यांच्या सर्व शंकाचे निरसन करावे. तसेच प्रत्येक स्लॅबचा योग्य फायदा नागरिकांना वीज बिलात देण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अधीक्षक अभियंता यांनी वीजबिलासंदर्भात ग्राहकांच्या  तक्रारींचे निरसन करण्यासाठी ग्राहक पंचायत घेऊन यामध्ये 2 हजार 300 ग्राहकांच्या समस्या सोडविण्यात आल्यात. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतला भेट देऊन गावातील नागरिकांच्या तक्रारी तिथेच सोडविण्यावर भर देण्यात येत असल्याची  माहिती यावेळी दिली.

या लॉक डाऊनच्या काळात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती यांनी अतिशय चांगले काम केले आहे.  या काळात लोक घरी असल्यामुळे घरगुती  वीजेचा वापर जास्त झाला.  तसेच चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे वीज वितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज पुरवठा अनेकदा खंडित झाला.  मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अतिशय कौशल्याने व  काळजीपूर्वक वीज पुरवठा जास्त वेळ खंडित राहणार नाही यासाठी 24 तास काम केले. यासाठी त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.        

यावेळी  महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री सुरेश वानखेडे, कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, सुरेश देशमुख, सुनील राऊत आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती – विभागीय आयुक्त

Next Post

‘टीकटॉक प्रो’ फेक लिंक पासून सावध!महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन

Next Post
‘टीकटॉक प्रो’ फेक लिंक पासून सावध!महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन

‘टीकटॉक प्रो’ फेक लिंक पासून सावध!महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo