Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

वृक्षलागवडीसह वृक्षसंगोपन करून हरित जळगावचे ध्येय गाठू – आयुक्त विद्या गायकवाड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/07/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
वृक्षलागवडीसह वृक्षसंगोपन करून हरित जळगावचे ध्येय गाठू – आयुक्त विद्या गायकवाड

मास्टर कॉलनीतील मनपा उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जळगाव दि.15 प्रतिनिधी – ‘निसर्गावरील मानवी अतिक्रमणामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यामुळेच कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ, कोरोनासारख्या महामारी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निसर्गाची जपणूक करणे आणि हरित सुंदर करणे यासह वृक्षसंवर्धनाचा वारसा पुढील पिढीला संस्कारित करणे. यासाठी वृक्ष लावणेच नाहीतर त्यांचे संगोपण करणे ही काळाची गरज आहे. असे सांगत हरित जळगावचे ध्येय झाडे जगवूनच गाठता येईल, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत जळगावकरांनी सहभागी होण्याचे आवाहन मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले.

मेहरूणमधील मास्टर कॉलनी परिसरातील मेमन हाजी इब्राहीम रानानी मनपा उर्दू प्राथमिक शाळा क्र. 36 व 56 आणि मनपा उर्दू माध्यमिक शाळा क्र.1 येथील वृक्षारोपणाप्रसंगी आयुक्त वर्षा गायकवाड बोलत होत्या. याप्रसंगी उद्योजक सुबोध चौधरी, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, मुफ्ती हारून शेख, नगरसेवक रियाज बागवान, सुन्ना बी राजू पटेल, युसूफ हाजी, मतिन पटेल, संदीप पाटील, फहीम पटेल, अक्रम देशमुख, शाहीद सय्यद उपस्थित होते. दोघंही शाळेतील जवळपास 1300 विद्यार्थ्यांनी झाडे जगविण्याचा निर्धार केला. झाडे लावण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. निंब, करंज, वड, गुलमोहर, रेन ट्री अशा विविध जातीची 120 च्यावर रोपांची लागवड शाळेत करण्यात आली. मुफ्ती हारून यांनी कुराणमधील दाखले देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व मुलांना समजून सांगितले.

ज्याप्रमाणे मनुष्य त्याचप्रमाणे वृक्ष सांभाळले गेले पाहिजे असेही ते म्हणाले. ऍड. जमिल देशपांडे यांनी वृक्षसंवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग किती मोलाचा आहे यावर भाष्य केले. अतिन त्यागी यांनी विद्यार्थ्यांशी विज्ञान आणि पर्यावरण याविषयावर सुसंवाद साधला. वातारणातील ऑक्सीजन, सूर्यप्रकाश, अन्नप्रक्रिया अतिन त्यागी यांनी समजून सांगितली. उर्दू शाळा क्र. 56 चे मुख्याध्यापक शे. नईमोद्दीन अमीनोद्दीन, शाळा क्र. 36 चे मुख्याध्यापक शे. कुरबान तडवी, उपमुख्याध्यापक शे. मो. अलीम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी नियोजनासह सहभाग घेतला. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, शंकर गवळी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. शे. मो. अलीम यांनी सूत्रसंचालन केले. शे. नईमोद्दीन अमीनोद्दीन यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ कुंदनदादा फेगडे मित्र परिवार आयोजित मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

Next Post

जिजाऊ ब्रिगेडच्या वसुंधरा लांडगे, रत्नाताई भदाणेंचे प्रयत्न;अमळनेर तालुक्यात विधवा विरोधी प्रथेला प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo