Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय योजनांच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन;स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या युवकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावेत. याकरीता संपूर्ण जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

     जिल्ह्यातील पहिल्या जिल्हास्तरीय मेळावा आज (13 फेब्रुवारी रोजी) सकाळी 10.00 वाजता के. सी. ई. सोसायटीचे मैदान, ए. टी.  झांबरे विद्यालयाजवळ होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहूणे म्हणून रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. रंजनाताई पाटील, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ. भारतीताई सोनवणे, आमदार श्रीमती स्मिताताई वाघ, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधि‍कारी  तथा मुद्रा बॅक समन्वय  समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

     या मेळाव्यात शासनाच्या विविध योजनांबाबत प्रबोधन करण्यात येणार असून प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेतंर्गत स्वयंरोजगारासाठी तसेच लघु उद्योगासाठी त्याचबरोबर आपला व्यवसाय वृध्दीगंत करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणेबाबत विविध बँकांचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर या मेळाव्याच्या ठिकाणी शासनाच्या कृषि विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, कौशल्य विकास विभाग, महिला व बालविकास, विविध राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाचे अंगिकृत व्यवसाय असलेली विविध विकास महामंडळांचे स्टॉल लावण्यात येणार असून याठिकाणी बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

     याचप्रकारचे मेळावे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी घेण्यात येणार असून त्याच्या तारखा व ठिकाण पुढीलप्रमाणे आहे. एरंडोल-17 फेब्रुवारी, डी. डी. एस. पी. महाविद्यालय, म्हसावद नाका. धरणगाव- 18 फेब्रुवारी, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. पारोळा- 24 फेब्रुवारी, कृषी उत्पन्न बाजार समिती. अमळनेर- 25 फेब्रुवारी,  साने गुरुजी विद्यालय, धुळेरोड. चोपडा- 27 फेब्रुवारी, पंकज महाविद्यालय,  बोरोले नगर, यावल रोड,  यावल- 28 फेब्रुवारी, धनाजी नाना महाविद्यालय. फैजपूर. रावेर- 29 फेब्रुवारी, विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय. मुक्ताईनगर- 2 मार्च, संत मुक्ताई कला  व  वाणिज्य महाविद्यालय. भुसावळ- 4 मार्च, बियाणी पब्लीक स्कुल, भिरुड हॉस्पिटलजवळ. बोदवड-6 मार्च, बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय.  जामनेर- 11 मार्च, एकलव्य माध्यमिक विद्यालय. पाचोरा- 12 मार्च, मानसिंगा मैदान, शिवाजी चौक, भडगाव- 13 मार्च, शेतकरी सहकारी संघ, पाचोरा रोङ. चाळीसगाव- 16 मार्च, 2020 रोजी राष्ट्रीय कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय याठिकाणी होणार असून सर्व मेळाव्यांची वेळ ही सकाळी 11 वाजता राहणार आहे.

     या मेळाव्यांना जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण, स्वयंरोजगार करु ईच्छिणारे युवक व लघु उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधि‍कारी  तथा मुद्रा बॅक समन्वय  समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी 29 फ्रेब्रुवारीपासून 5 दिवसांचा आठवडा;कर्मचार्‍यांमध्ये उत्साह

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

Next Post
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d