Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय रुग्णालयाच्या आवारात जनसंपर्क कक्षाला सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शासकीय रुग्णालयाच्या आवारात जनसंपर्क कक्षाला सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी दि. ३ जानेवारी जनसंपर्क कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच, रुग्णालय व महाविद्यालयाच्या आवारात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले असून लवकरच दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पदभार घेतल्यानंतर सुधारणांना सुरुवात केली आहे. तीन महिन्यांपूर्वी बंद झालेला जनसंपर्क कक्ष सोमवारी दि. ३ जानेवारी सुरु करण्यात आला. सोमवारी ओपीडीमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी रुग्णांनी गर्दी केली होती. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जिल्ह्यातून शेकडो नागरिक वैद्यकीय सेवा घेण्यासाठी दररोज येत आहेत. रुग्णालयाच्या आवारात मुख्य गेट क्र. १ समोर केसपेपरच्या विभागाची सुविधा केल्यामुळे गर्दी नियंत्रित राहून रुग्णांसह नातेवाईक सुखावले आहेत. तसेच, परिसरातच मध्यवर्ती ठिकाणी उभारलेल्या जनसंपर्क कक्षातून नागरिक, दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य माहिती मिळत असल्याने हेलपाट्या कमी झाल्या आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावच्या माध्यमातून जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे हा उद्देश ठेऊन प्रशासन काम करीत आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून रोज अभिप्राय घेऊन बदल केले जाणार आहे. तसेच केसपेपर काढण्यासाठी महिला व पुरुषांची वेगळी रांग आणि कायदेशीर प्रकरणासाठी (एमएलसी) तिसरी खिडकी सुरु झाली आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांचा वेळ वाचत आहे. तसेच रुग्णांसह नातेवाईकांना, नागरिकांना माहिती देण्यासाठी आवारातच जनसंपर्क कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे नातेवाईकांना रुग्णाची माहिती मिळणे, ओपीडी, योजनांविषयी, रुग्णालय व महाविद्यालयातील सोयीसुविधांविषयी माहिती दिली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या, रुग्णांसह नातेवाईकांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. रुग्णालय अद्ययावत होत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo