Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु;समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु;समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांची माहिती

शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकिया सुरु,

जळगांव दि.५ (जिमाका वृत्तसेवा) : –   29 जून, 2022 पासून  समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जळगांव जिल्ह्यातील एकुण 12 शासकीय वसतिगृहासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलै 2022 पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी  दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच बीए/बीकॉम/बीएसएस्सी इयत्ता 12 वी नंतरच्या पदवीका /आणि पदवी नंतरचे पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी दि. 24 ऑगस्ट 2022 पंर्यत (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) व व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया दि.30 सप्टेबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडुन करण्यात आले आहे.

          जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी इयत्ता 10 वी 11 वी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक / व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशीत विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता 8 वी पासुन ते पुढील अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.

          शालेय विद्यार्थीसाठी दि 15 जुलै 2022 इयत्ता 10 व 11 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीसाठी दि 30 जुलै 2022  बी.ए./बी.कॉम / बी.एस.सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश घेतलेल्या पदवीका / पदवी आणि एम.ए/ एम.कॉम./ एम.एस.सी असे पध्दती नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदवीका इत्यादी अभ्यासक्रम (व्यवसायीक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थी यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत हो दि 24 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. तर व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यांनी दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो.

          विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्याथ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपले अर्ज विहीत वेळेत समक्ष परिपूर्ण माहितीसह सबंधित वसतिगृहातच सादर करावेत, अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जळगांव येथे संपर्क साधावा, असे आवाहन, सहायक आयुक्त समाज कल्याण जळगांव वाय.पी.पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली राज्यपालांची भेट

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo