Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरु

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
09/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरु

जळगांव(प्रतिनिधी)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील बालरोग व चिकित्साशास्त्र विभागात कोरोना महामारीमुळे बंद असलेला पोषण पुनर्वसन विभाग हा अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा सुरु करण्यात आला.

याठिकाणी कुपोषित बालकांवर उपचार करणे, त्यांची काळजी घेणे यासह डॉक्टरांकडून देखरेख ठेवली जाते. जिल्हयातील कुपोषित बालकांचे आहार आणि औषोधपचाराने पुनर्वसन करण्यात येत आहेत. रुग्णालयात बाल रोग व चिकित्सा विभागात ५ खाटांचा हा विभाग असून जिल्हृयातील कुपोषित बालकांसाठीचे हे केंद्र आहे. कोरोना महामारीच्या काळात हे केंद्र बंद होते. हे केंद्र आता सुरु करण्यात आले आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड उपस्थित होते.

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले की, जिल्हृयात कुपोषित बालकांचा प्रश्न मोठा आहे. त्या तुलनेत रुग्णालयात साधन सामुग्री नसली तरी आपल्याकडे आत्मविश्वास अधिक आहे. या केंद्राच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून कर्मचारी भरतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाहीसुध्दा डॉ.रामानंद यांनी दिली.

प्रारंभी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. याप्रसंगी बालरोग व चिकित्सा विभाग प्रमुख डॉ.बाळासाहेब सुरोशे, पोषण पुनर्वसन केंद्राचे डॉ.एस.जी.बडगुजर, डॉ.एस.एस.बन्सी, इन्चार्ज सिस्टर निर्मला सुरवाडे, संगिता सावळे, काळजीवाहक उमा सावकारे, नयना चावरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

शिकाऊ उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन

Next Post

सर्पदंश टाळण्यासाठी शेतात, घराजवळ वावरताना काळजी घ्यावी -वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित

Next Post
सर्पदंश टाळण्यासाठी शेतात, घराजवळ वावरताना काळजी घ्यावी -वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित

सर्पदंश टाळण्यासाठी शेतात, घराजवळ वावरताना काळजी घ्यावी -वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo