Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा हृदय सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/09/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा हृदय सन्मान करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाविषयी भाषणे देऊन माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद होते. मंचावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. अरुण कसोटे, डॉ. भाऊराव नाखले उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी भेटकार्ड, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

यावेळी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाची भाषणे दिली. यात त्यांनी आजच्या शिक्षण पद्धतीवर माहिती सांगून विविध विचारवंतांनी शिक्षणाविषयी मांडलेले विचार सांगितले. यावेळी शिक्षकांमधून डॉ. विलास मालकर, डॉ. इम्रान तेली यांनी मनोगत व्यक्त करीत, शिक्षण घेत असताना शिक्षकांचा सन्मान, आदर, त्यांच्या गौरवशाली कार्याचे स्मरण ठेवावे, असे सांगितले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले की, विद्यालयात शिक्षकांच्या सहवासात विद्यार्थ्यांचे चरित्र उजळून निघत असते. मात्र त्यासाठी ज्ञानाची कठोर साधना, उत्तम अध्ययन पद्धती महत्वाची आहे. शिक्षक हा उत्तम मार्गदर्शक असतो. शिक्षक विद्यार्थ्यांना जीवन विकासाची दिशा देतो, असे सांगून विविध उदाहरणे देऊन डॉ. रामानंद यांनी शिक्षक दिनाविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी डॉ. प्रवीण शेकोकार, डॉ. अनिल पाटील, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. मोनिका युनाती, धनश्री पाटील, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. रितेश सोनवणे, डॉ. प्रदीप लोखंडे, सफोरा तोहरींम, शाहनवाज खान, डॉ. विनेश पावरा, डॉ. चंदन महाजन, डॉ. संजय धुमाळे, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृतिका होसवाल हिने मानले. यावेळी तिन्ही वर्षाचे विद्यार्थी प्रतिनिधी राज सिंग, युवराज जाधव, वरद पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सर्व जाती-धर्मांना बांधणारा ‘भारतीयत्व’ हा धागा;जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Next Post

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिन संपन्न

Next Post

सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकदिन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo