Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शासनाच्या प्रतिमा निर्मितीसाठी समाज माध्यमाचा वापर आवश्यक -दयानंद कांबळे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
14/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
शासनाच्या प्रतिमा निर्मितीसाठी समाज माध्यमाचा वापर आवश्यक -दयानंद कांबळे

नवी मुंबई(प्रतिनिधी)- माहिती व जनसंपर्क विभाग हा केवळ माहिती देण्यासाठी नाही तर, शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी आहे. शासनाची चांगली प्रतिमा तयार करणे ही पारंपारिक माध्यमांसोबतच नवीन समाज माध्यम व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारेही जलदगतीने केली जाऊ शकते. मात्र यात सातत्य असणे आवश्यक आहे. नवीन माध्यम हाताळतांना तांत्रिक आणि आशय निर्मितीबाबतची माहिती असणे गरजेचे आहे. असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रभारी संचालक (वृत्त) श्री.दयानंद कांबळे यांनी व्यक्त केले.

आज विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन येथे “समाज माध्यमांचा सुलभतेने वापर: शासन प्रतिमा” या विषयावर आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण सत्राच्या प्रारंभी ते बोलत होते. या प्रशिक्षण वर्गात पालघर,ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकण भवन येथील अधिकारी/कर्मचारी सहभागी झाले होते.अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन कामातील गुणवत्ता वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. असे मत वैद्यकीय अधिकारी तथा कोकण भवन राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी डॉ.गणेश धुमाळ यांनी व्यक्त केले.

अधिकारी महासंघातर्फे देखील तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी विभागीय माहिती कार्यालयाने पुढाकार घ्यावा असे सुचविले. ऑनलाईन प्रशिक्षण सत्राच्या प्रारंभी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून सदर प्रशिक्षणास शुभेच्छा दिल्या.श्री लिलाई डिजीटल कम्युनिकेशन लि. यांच्या वतीने श्री.प्रणवकुमार भदाणे आणि श्री.चारुहास भदाणे यांनी शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमांचा सुलभतेने व दक्षतेने कसा वापर करावा या विषयावर प्रात्यक्षिकासह तांत्रिक मार्गदर्शन केले. संगणक आणि मोबाईलचा उपयोग करतांना सुरक्षितता असणे कसे आवश्यक आहे. या सोबतच अधिकाधिक लोकांच्या समोर जातांना कोणती नवमाध्यमे उपयुक्त ठरतील. याबाबतही माहिती त्यांनी दिली.

यावेळी ऑनलाईन सहभागी असणारे अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांना प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणीबाबत प्रश्नोत्तरे केली.प्रशिक्षणाच्या प्रारंभी उपसंचालक (माहिती) कोकण विभाग डॉ.गणेश मुळे यांनी प्रास्ताविक केले. तर सहाय्यक संचालक (माहिती) श्री.नंदकुमार वाघमारे यांनी आभार मानले. ऑनलाईन प्रशिक्षण सत्रासाठी विभागात समन्वयाचे काम माहिती सहाय्यक श्री.प्रविण डोंगरदिवे यांनी पाहिले.

Team Satymev Jayate

Previous Post

आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी; एक कोटीची भरघोस वाढ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला

Next Post

देशाला अभिमान वाटेल असे क्रीडा विद्यापीठ उभारणार -क्रीडामंत्री सुनिल केदार

Next Post
देशाला अभिमान वाटेल असे क्रीडा विद्यापीठ उभारणार -क्रीडामंत्री सुनिल केदार

देशाला अभिमान वाटेल असे क्रीडा विद्यापीठ उभारणार -क्रीडामंत्री सुनिल केदार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo