Monday, August 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/08/2026
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

‘ज्ञानदीप’ अभियानांतर्गत विवेक यशवंते यांच्या वाढदिवसानिमित्त संत चोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव, (प्रतिनिधी) : “उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणातून परिवर्तन आणि क्रांती घडवून आणता येते, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करून ध्येय निश्चित करावे. तुम्हीच देशाचे उद्याचे भविष्य आहात. आज मिळणारे शैक्षणिक साहित्य ही मदत म्हणून स्वीकारू नका; तर समाजाने तुमच्याकडून ठेवलेली एक आशा म्हणून स्वीकारा,” असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे राज्य कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ज्ञानदीप’ अभियानांतर्गत विवेक यशवंते यांच्या वाढदिवसानिमित्त संत चोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप निर्मल यशवंते आणि प्रविण सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रविण सपकाळे म्हणाले की, शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून समाज आणि देशाच्या परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि क्रांती घडू शकते, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातून सिद्ध केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी.

“विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य आणि डोळ्यांत उज्ज्वल भविष्याचे स्वप्न” या भावनेतून राबविण्यात आलेल्या ‘ज्ञानदीप’ अभियानाचे विवेक यशवंते, निर्मल यशवंते यांच्यासह वसतिगृह प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात पुढे जाण्यासाठी मदतीचा हात देण्याचे कार्य ‘ज्ञानदीप’ अभियानाच्या माध्यमातून सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई व प्रज्ञावंत फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी संत चोखामेळा वसतिगृहाचे शिक्षक सम्यक इंगळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo