Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवभोजनालय चालविण्यास इच्छूक संस्थांनी 29 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका) दि.26 :-  जळगाव शहरातील शिवभोजन योजनेतील भोजनालयांचा इष्टांक दुप्पटीने वाढविण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. जळगाव शहरात, गरीब व गरजू जनतेच्या सेवेसाठी वर्दळीच्या ठिकाणे असलेल्या नविन बस स्थानक, रुग्णालये, जुने बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा इत्यादी सार्वजनिक ठिकाणी शिवभोजन योजनेतंर्गत शिवभोजनालय सुरु करण्यासाठी इच्छुक असलेल्या महिला बचत गट, भोजनालय चालक, खानावळ चालक, हॉटेल चालक, रेस्टॉरंट चालक, अशासकीय संस्था, महिला गृहउद्योग संस्थांनी 29 फेब्रुवारी, 2020 पर्यंत जिल्हा पुरवठाअधिकारी, जळगाव यांचेकडे अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

           शिवभोजनालयासाठी अर्ज करणाऱ्या महिला बचत गट, भोजनालय, खानावळ, हॉटेल रेस्टॉरंट, अशासकीय संस्था, महीला गृहउद्योग संस्था इत्यादींना भोजनालयाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थीतीत सुरु असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी भोजनालयात एकाचवेळी किमान 25 व्यक्ती भोजन करु शकतील एवढी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. शिवभोजनालयासाठी संबंधित व्यक्ती अथवा संस्थांची जागा स्वमालकीची अथवा भाडे तत्वावर असलेबाबतचा स्पष्ट उल्लेख करुन जागा किती स्वेअर फुटाची आहे याचा उल्लेख अर्जात करणे आवश्यक राहील. संबंधित अर्जदाराची शिवभोजनालय चालक म्हणून निवड झाल्यावर शासनाकडून वेळोवेळी निर्गमीत होणा-या अटी व शर्तीचे पालन करणे त्यांचेवर बंधनकारक राहील.

             इच्छूक अर्जदारांनी अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील. असे जिल्हाधिकारी, जळगाव तथा अध्यक्ष, शिवभोजन योजना डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज व. वा. वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

कृषि विभागाच्या प्रचलित लोगोमध्ये बदल प्रस्तावित उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्यास मिळणार एक लाख रुपयांचे पारितोषिक

Next Post

कृषि विभागाच्या प्रचलित लोगोमध्ये बदल प्रस्तावित उत्कृष्ट लोगो तयार करणाऱ्यास मिळणार एक लाख रुपयांचे पारितोषिक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo