Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने राज्यात व्याख्यानमाला स्पर्धा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने राज्यात व्याख्यानमाला स्पर्धा

रत्नागिरी(प्रतिनिधी)- शिवचरित्र राज्यातील प्रत्येक युवकास माहिती असणे आवश्यक आहे, यासाठी राज्यातील 13 विद्यापीठांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाने व्याख्यानमाला स्पर्धा घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.उच्च तंत्रशिक्षण विभागातर्फे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला.

येथील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. शिवशाहीरांनी शिवजागर केला त्यांची परंपरा पुढे सुरु रहावी यासाठी प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचे व्याख्यान यावेळी झाले.

कार्यक्रमात बोलताना सामंत म्हणाले की, राज्यात वक्तृत्वातून देखील विकास शक्य आहे याची ओळख प्रा. बानगुडे यांच्या वक्तृत्वशैलीतून होते. अशीच परंपरा पुढेही चालू राहिली पाहिजे याचसाठी राज्यात 13 विद्यापीठात अशी स्पर्धा सुरु करण्यात येत आहे.याप्रसंगी प्रा. बानगुडे यांनी शिवचरित्र विषयावर व्याख्यान देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे युध्दकौशल्य, गनिमी कावा तसेच सांस्कृतिक पुढाकार, त्यांची आरमाराची दूरदृष्टी यावर आपल्या खास शैलीत शिवचरित्र उलगडून दाखवले.

शिवाजी महाराज त्यांच्या काळात जगातले सर्वोत्तम सेनापती होते आणि त्यांनी अनेक राष्ट्रीय चारित्र्याची माणसे घडविली असे प्रा. बानगुडे म्हणाले.कार्यक्रमाच्या आरंभी बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट उलगडून दाखविणारा एक वृत्तपट दाखविण्यात आला. त्यानंतर श्रध्दांजलीचा कार्यक्रम झाला. जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नागरिकांची कार्यक्रमास उपस्थिती होती.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये

Next Post

दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन; सर्व शाळांना देणार भेट

Next Post
दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन; सर्व शाळांना देणार भेट

दामिनी पथकाचे मुंदडा विद्यालयात समुपदेशन; सर्व शाळांना देणार भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d