Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन

जळगाव : येथील शिवसेना महानगरतर्फे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी शिवसेना मदत कक्षाचे उदघाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी सॅनिटायझर व कोरोना स्क्रिनिंग उपलब्ध करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विष्णू भंगाळे,  विराज कावडिया अमित जगताप मंचावर उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने आणि संपर्क मंत्री संजय सावंत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच कोरोना तपासणी करण्यासाठी एक मशीन उभारण्यात आली असून बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. जर शरीराचे तापमान 100 च्या वर जात असेल तर त्यांना तपासणी साठी पाठवले जात आहे. कोरोना आजार होऊ नये यासाठी मार्गदर्शन देखील केले जात आहे. 
यावेळी शरद तायडे यांनी सांगितले की,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. शिवसेना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर राहील . यावेळी नागरिकांना मास्क देखील वाटप करण्यात येऊन माहितीचे पोस्टर्स वाटण्यात आले. दिवसभरात 1691 लोकांची तपासणी करण्यात आली. यातील 3 जणांना ताप दिसला. त्यांना समुपदेशन करून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. 
यावेळी मदत कक्षासाठी मनजीत जंगीड, तेजस दुसाने, पियुष हसवाल, सौरभ कुलकर्णी, पियुष तिवारी, मयूर जाधव, आकाश धनगर, जितेंद्र छाजेड आदींनी परिश्रम घेतलें.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अतिक्रमण विरोधात पाचोऱ्याच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन

Next Post

नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

Next Post
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री                                   ना.गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo