Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी अनुदानित हरबरा बियाण्यांचाच उपयोग करावा -कृषी मंत्री

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
18/10/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात -कृषिमंत्री

नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- राज्यात आजपासून 24 ऑक्टोबर पर्यंत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दर्जेदार अनुदानित बियाण्यांचा उपयोग करावा असे आवाहन कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

आज आंतरवेली फाटा, पिंपळगाव येथे आयोजित हरबरा प्रमाण‍ित बियाण्यांच्या राज्यस्तरीय वितरण शुभारंभ् प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आमदार दिलीप बनकर, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे,कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ , उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, निफाड तालुका कृषी अधिकारी भटू पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी कृषि मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, आज शुभारंभ झालेल्या प्रमाणित हरभरा वितरण सप्ताहाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची पीक उत्पादन क्षमता वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे. या प्रयोगातून वितरण केल्या जाणाऱ्या 20 किलोच्या बियाण्यांच्या बॅगची किंमत रूपये 1 हजार 720 इतकी आहे. परंतु एका बॅग मागे रूपये 500 सूट मिळणार असून शेतकरऱ्यास ती बियाण्याची बॅग 1 हतार 220 या किंमतीत उपलब्ध होणार आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी 8 हजार क्विंटल प्रमाणित हरबरा बियाण्यांच्या साठ्याची तरतुद करण्यात आली आहे. यात पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत व फुले विक्रम या वाणाचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचप्रमाणे रबी हंगामासाठी गव्हाचे बियाणे सुध्दा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली आहे.यावेळी प्रातिनिधी स्वरूपात स्थानिक महिला शेतकरी विभावरी गांगुर्डे, मिनाक्षी जाधव व उत्तेशा विधाते यांना 20 किलो प्रमाणित हरबरा बियांण्याच्या बॅगचे वितरण कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नागपूर अधिवेशनाच्या तयारीसाठी विशेष कोविड प्रतिबंधात्मक नियोजन

Next Post

राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार -मुख्यमंत्री

Next Post
राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार -मुख्यमंत्री

राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार -मुख्यमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d