Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मोहा मध्ये ग्रामपंचायत कडून शाळेत निर्जंतुकीकरण फवारणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मोहा मध्ये ग्रामपंचायत कडून शाळेत निर्जंतुकीकरण फवारणी


कळंब, प्रतिनिधी / हर्षवर्धन मडके
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कळंब तालुक्यातील मोहा मधील विद्यार्थी सुरक्षेसाठी परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले.
मागील तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून देशासह राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. दरवर्षी १५ जून सुरु होणाऱ्या शाळा विद्यार्थी सुरक्षितता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद आहेत. राज्य सरकार ग्रीन झोन असणाऱ्या भागांमध्ये काही नियम आणि अटी निर्धारित करून शाळा सुरु करण्याची प्रक्रिया करण्याच्या विचाराधीन आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर आणि शालेय स्तरावर शाळा सुरु होण्याच्या संदर्भातील कामास सुरवात झाली आहे. राज्य सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी सुरक्षा आणि शाळांची दुरुस्तीच्या बाबतीत समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी भविष्यकालीन तयारी सुरु करण्यात आली आहे.  जिल्हा पातळीवरही प्रशासन या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाय योजना करीत आहेत. याचा एक भाग म्हणून मोहा ग्रामपंचायतच्या वतीने मागील तीन महिन्यांपासून विविध उपाययोजना राबवल्या आहेत. राज्यात आता प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरु करण्यात येणार आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे. 
मोहा मध्ये ग्रामपंचायत वतीने कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच ज्ञानप्रसार विद्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून पुणे मुंबई तसेच रेड झोन मधील परतलेल्या नागरिकांना ज्ञानप्रसार विद्यालयात क्वॉरंटाईन करण्यात आले होते परंतु राज्यसरकारने रुग्ण नसलेल्या भागात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जुलै पासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कडून दक्षता घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्ञानप्रसार विद्यालय तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक  शाळेत सॅनिटायझर तसेच जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.
“शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. मुलांचे आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, आवश्यक सुविधा पुरवठा या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. कोरोना संकटाच्या पश्चात शासकीय निर्णयानंतर शाळा सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. मुले येण्याआधी शाळा स्वच्छता आणि वर्गांमधील लहानसहान दुरुस्त्या करून सज्ज असायला हव्यात यासाठी शाळा परिसर स्वच्छ, निर्जंतुक करणे असे काम सुरु करण्यात आले असल्याचे मोहाचे सरपंच राजू झोरी यांनी सांगितले.”
शाळेत निर्जंतुकीकरण फवारणी करताना मोहाचे सरपंच राजू झोरी, ग्राम विकास अधिकारी सी एन लोकरे, ज्ञानप्रसार विद्यालयाचे मुख्याध्यापक टी जे चौधरी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक जावळे सर, सलीम मोमीन, अतुल मडके, गणेश झोरी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना साकड; राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र स्थलांतराचा निर्णय मागे घेण्याची मागणी

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज १८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज आणखी १३५ कोरोना बाधित रुग्ण आढळले;एकुण कोरोना बाधित संख्या २०२०

जळगाव जिल्ह्यात आज १८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo