Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शॉपिंग मॉलमधील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश नाहीत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार – जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे

जळगाव, दि. 17  (जिमाका) – कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 लागु  करण्यात आला आहे. याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरीकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान (Grocery) दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय (Chemist Shop) वगळून 31 मार्च, 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले होते.

            परंतु या आदेशाच्या गैरअर्थ लावण्यात येऊन सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या संदेशामधून जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना बंद करण्यात आल्याचे मेसेज व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

            यानुसार सर्वांना कळविण्यात येते की, हा आदेश फक्त जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉलमधील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान (Grocery) दुध व भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू व औषधालय (Chemist Shop) वगळून यांनाच लागू आहेत. सर्व शॉपिंग मॉल वगळता इतर दुकाने व आसथापना बंद करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही निर्देश देण्यात आलेले नसल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. ढाकणे  यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विभागीय हातमाग कापड स्पर्धा स्थगित

Next Post

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचे निर्देश

Next Post

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचे निर्देश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo