

श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरून, जळगाव, मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले आहे

नमो नेत्र संजीवनी स्वाथ्य अभियान अंतर्गत विशेष नेत्र शिबीर

आज दि. २०/०९/२५ रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्यामार्फत श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरून, जळगाव, येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान मेहरूण, रामेश्वर कॉलोनी परिसरातीलतसेच नागरिकांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.यावेळी होमिओपॅथी तज्ञ डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. अमिता श्रीवास्तव यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली तसेच नेत्रचिकित्सक डॉ. जयेश वाल्हे यांनी नेत्र तपासणी केली. या सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधी देण्यात आली तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात आलेल्या, तसेच शाळेतील 12 वर्षावरील किशोरवयीन विद्यार्थिनींना डॉ. अमिता श्रीवास्तव व प्रशिक्षणार्थी डॉ. प्राची खलसे यांनी किशोरवयीन विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यान येणाऱ्या समस्या आणि यावेळी कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. रुग्णांना डॉक्टरांनी मोफत मार्गदर्शन केले. कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स प्राची खलसे, भावना दातीर , हषदा पाटील, श्रद्धा चौधरी,फैज खान ई.उपस्थित होते.तसेच शाळेतील मुख्याध्यापक. मुकेश नाईक सर शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर,प्राचार्य. डॉ.सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक श्री. डॉ.नरेंद्र शर्मा, यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री. नवल परदेशी,व आकाश सोनावणे,शाळेचे मुख्याध्यापक . मुकेश नाईक सर यांनी मेहनत घेतली…

तसेच प्रत्येक महिन्याला मोफत आरोग्य तपासणी करून देण्याचे आश्वासन श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज त्यांच्याकडून देण्यात आले आहे.











