Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री समर्थ विद्यालयाचे “कलादर्पन२०१९-२०” वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
श्री समर्थ विद्यालयाचे “कलादर्पन२०१९-२०” वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

 विद्यार्थ्यांनी दाखविले विविध कलागुण 

जळगांव(प्रतिनीधी)- श्री समर्थ बालक मंदिर, श्री समर्थ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल आव्हाने शिवार या शाळांचे कलादर्पन २०१९-२० वार्षिक स्नेहसंमेलन शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील शिक्षकांनी गेल्या महिन्याभरापासून मोठया मेहनतीतून हा कार्यक्रम साकार केला. विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कला गुण सादर करत प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील व उद्घाटक चोपडा मतदार संघाचे आ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड, कृउबा सभापती कैलास चौधरी, पं.स. सभापती नंदु पाटील, पं.स. सदस्य हर्षल चौधरी, जि.प. प्राथ.माध्य. शिक्षणाधिकारी बि.जे. पाटील, नुतन मराठा महाविद्यालय प्राचार्य एल.पी. देशमुख, लोकसहकार गटाचे अध्यक्ष विलास नेरकर, संस्था तथा ग.स.अध्यक्ष मनोज पाटील, मौलाना आझाद फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख, संस्थेचे सचिव ज्योतीमाई पाटील, संस्थेचे संचालक रविंद्र पाटील, कु. प्रतिक्षा पाटील आदी पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते. या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन बालकांच्या विविध कलापूर्ण आविष्कारांनी आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी संस्मरणीय ठरले. यामध्ये स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाव, पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावर विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी अशी संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष ना. गुलाबराव पाटील  केले. याप्रसंगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत गीतगायन, नृत्य, नाटिका, लोकनृत्य असे विविध कलागुण दाखवित वाहवा मिळविली. याप्रसंगी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून या बालकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी नयनरम्य कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र साळुंखे व शितल अहिरे यांनी केले तर आभार प्राथ. शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांनी  मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, संगिता देशमुख यांच्यासह शिक्षक चैताली पाटील, जयश्री पाटील, सद्दाम तडवी, राहुल पाटील, आश्विनी पाटील, स्वाती भिरुड, शुभांगी गजरे, प्रज्ञा बाविस्कर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कानळदा येथे निलेश बॉक्सिंग क्लब व जळगाव जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन संस्थेतर्फे “मिनी मॅरेथॉन” स्पर्धा संपन्न

Next Post

प्रगती विद्यामंदिर शाळेतर्फे पल्स पोलिओ जनजागृति रॅली संपन्न

Next Post
प्रगती विद्यामंदिर शाळेतर्फे पल्स पोलिओ जनजागृति रॅली संपन्न

प्रगती विद्यामंदिर शाळेतर्फे पल्स पोलिओ जनजागृति रॅली संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d