Friday, October 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सय्यद यांचे कुटुंबीयांना 25 हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

अहमदनगर – (प्रतिनिधी) – ज्येष्ठ पत्रकार रियाज सय्यद यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांचे कुटुंबीयांना 25 हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला तसेच संगमनेर येथील ज्येष्ठ पत्रकार सुखदेव गाडेकर यांना तातडीच्या औषध उपचारासाठी देखील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने 25 हजार रुपयांचा धनादेश संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी विश्‍वासराव आरोटे यांनी सांगितले की, जेवढे संघटनेचे सभासद आहेत. त्या सर्व सभासदांची एक महिन्यात मेडीक्लेम पॉलिसी काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे व संघटक संजयजी भोकरे यांच्या संकल्पनेतून पत्रकारांच्या कुटुंबियांना गरजेच्या वेळी आर्थिक सहाय्य केले जात आहे. वास्तविक शासनानेच पत्रकारांचे धावपळीचे जीवन लक्षात घेऊन त्यांना मोफत औषधोपचारासाठी योजना आणली पाहिजे परंतु सद्या अशी कुठलीही योजना नसल्याने पत्रकार संघाच्या माध्यमातून सभासदांना मदत करण्यासाठी पत्रकार संघ बांधील आहे. तो पत्रकार संघटनेचा सभासद असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरुवातीला काम करतांना खूप अडीअडचणी आल्या अनेकांनी नावेही ठेवली. पण तरीही आपण न डगमगता संघटनेसाठी काम करत राहिलो आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य 36 जिल्ह्यांमध्ये आहे.यावेळी पत्रकार स्व. रियाज सय्यद यांचे बंधू सादिक सय्यद यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल राहणे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, तालुकाध्यक्ष अशोक उगले आदी उपस्थित होते. कुटुंबीयांना मदतीचा हात देऊन पत्रकार संघाने खूप प्रेरणादायी कार्य केले आहे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य आमचे कुटुंबातील सदस्य कधीही विसरणार नाही असे भावनिक उद्गार यावेळी सादिक सय्यद यांनी काढले.संगमनेर येथील पत्रकार संघाच्या बैठकीत रुग्णालयात औषधोपचार घेत असलेले सुखदेव गाडेकर यांच्यासठी 25 हजार रुपयांचा धनादेश श्री.आरोटे यांच्याहस्ते देण्यात आला. सुखदेव गाडेकर यांना काही दिवसांपुर्वी हृदयाच्या त्रासामुळे खासगी रुग्णालयामध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्यावर आर्थिक व मानसिक ताण पडला. परंतु महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून दिली. ज्येष्ठ पत्रकार दत्ताभाऊ उणवने, जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे, कार्याध्यक्ष अनिल चौधरी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके, पत्रकार दत्ता गाडगे, दत्ता जाधव, भाऊसाहेब पुंजा वाकचौरे, संगमनेर शाखेचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ मदने, तालुका सचिव संजय गोपाळे, सदस्य राजू नरवडे, शेखर पानसरे, विकास वाव्हळ, बाबासाहेब कडू, संजय साबळे, भारत पडवळ, बाळासाहेब गडाख, अंकुश बुब आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हिंगोणा अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देणार

Next Post

तानाजी मालुसरे या नरवीराचा आज 4 फेब्रुवारी रोजी बलिदान दिवस

Next Post

तानाजी मालुसरे या नरवीराचा आज 4 फेब्रुवारी रोजी बलिदान दिवस

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo