Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

भैय्यासाहेब गंधे सभागृह जिल्हा पेठ जळगाव येथे रंगला शास्त्रीय संगीत महोत्सव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/02/2025
in जळगाव
Reading Time: 1 min read
सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन

जळगांव -(प्रतिनिधी)- सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा ०२ ते ०४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ६ ते १० या वेळेत वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृह, जिल्हा पेठ, जळगाव या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना मा. सांस्कृतिक कार्यमंत्री मा. श्री.ॲड आशिष शेलार यांची असून, श्री. विकास खारगे मा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हा माहिती अधिकारी श्री युवराज पाटील, लोक कलाकार श्री विनोद ढगे, स्व. वसंतराव प्रतिष्ठाण चे अध्यक्ष विवेकानंद कुलकर्णी तसेच सहसंचालक श्रीराम पांडे हे हजर होते.

प्रस्ताविक सहसंचालक श्रीराम पांडे यांनी केले तर या महोत्सवास जिल्हा माहिती अधिकारी श्री युवराज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. 02 फेब्रुवारी, 2025 रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक गायक चैतन्य परब, ख्यातनाम गायिका अमृता काळे, विख्यात सारंगीवादक साबीर खान, ज्येष्ठ गायक पंडित हरीश तिवारी यांचे सादरीकरण झाले. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. 3 फेब्रुवारी रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक ऋतुराज धुपकर व कृष्णा साळुंखे, प्रसिध्द गायक अनुरत्‍न रॉय, बासरीवादक चिंतन कट्टी व ज्येष्ठ गायक धनंजय जोशी यांचे सादरीकरण होणार आहे मंगळवारी 4 फेब्रुवारी 2025 रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक जगन्‍मित्र लिंगाडे व यश खडके यांची जुगलबंदी, प्रसिध्द गायिका रौकिंणी गुप्ता यांचे गायन होणार आहे तर पद्मश्री पंडित रोणू मुजुमदार व ऋषिकेश मुजुमदार यांचे बासरी सहगायन व ज्येष्ठ गायक पंडित आनंद भाटे यांचे गायन असे नामवंत कलाकार आपली शास्त्रीय संगीत गायन व वादन कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमास स्वर्गीय वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांनी सहकार्य केले आहे. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री विभीषण चवरे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले बजेटचे स्वागत;हे बजेट राष्ट्रीय विकासासाठी सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक

Next Post

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट;फाईट व पुमसे मध्ये १३ गोल्ड, ६ रौप्य, ४ कांस्य पदकांची कमाई

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo