Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सातबारावर स्त्रीयांचे नाव लागेल तेव्हाच स्त्री-पुरूष समानता प्रस्तापित होईल – अनिल जैन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

विकास संवाद व गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजीत 15 व्या राष्ट्रीय मीडिया संवादामध्ये मार्गदर्शन करताना जैन इरिगेशन कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन. व्यासपिठावर चिन्मय मिश्र, सचिन कुमार जैन.


15 वा राष्ट्रीय संवादाची सुरूवात; गांधी तीर्थला 16 राज्यातून 100 च्यावर अभ्यासकांचा सहभाग


जळगाव दि.25 प्रतिनिधी – शेतीच्या सातबारा पुरूषांच्या नावे असतो; मात्र शेतात सर्वाधिक काम महिला करत असतात. जेव्हा पुरूषांच्या बरोबरीने स्त्रीयांचे नाव सातबारामध्ये लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री पुरूष समानता प्रस्तापित होईल असे महत्त्वपूर्ण विचार जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते विकास संवाद या संस्थेचे ‘लैंगिक पहचान की चुनौती समानता के सवाल’ हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.


गांधी तीर्थ, जैन हिल्स येथे विकास संसद आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक पहचान की चुनौती और समानता के सवाल’ या तीन दिवसीय 15 वा राष्ट्रीय संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटक म्हणून अनिल जैन बोलत होते. ही परिषद 27 नोव्हेंबर पर्यंत आहे. पुढे बोलताना अनिल जैन म्हणाले की, आज आपण ज्या जैन हिल्स, गांधीतीर्थ येथे आहोत ते निर्माण करण्यासाठी माझ्या वडिलांना श्रद्धेय भवरलालजी जैन यांना माझी आज्जी गौराई यांनी सात हजार रूपये जी संपूर्ण कुटुंबाची जमापूंजी होती ती दिली. यातून आठ हजार करोड व्यवसायाचा टप्पा गाठणारी कंपनी उभी राहिली. व्यवसायातील पहिली भागीदार आई असे भवरलालजी जैन मानायचे. त्यामुळे स्त्री-पुरूष समानतेचे बाळकडू आम्हाला आपसूक मिळाले.


या राष्ट्रीय संवादात देशभरातील 16 राज्यातून शंभराहून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विकास संवादचे समन्वयक सचिनकुमार जैन यांनी प्रास्ताविकात विकास संवाद आणि त्यांचे कार्य याबाबत उपस्थितांना परिचय करून दिला. तर डॉ. अश्विन झाला यांनी गांधी तीर्थ व जैन हिल्स बाबतची माहिती दिली. पहिल्या सत्रात रिता भाटिया यांनी उपस्थितांशी सुसंवाद साधला. नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ यांनी गांधी विचारांच्या दृष्टीने स्त्री-पुरूष समानतेची व्याख्या समजावून सांगितली. सुप्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास पाटील यांनी शब्दांच्या माध्यमातून खान्देश व जळगावची सैर घडवून दिली. पुणे येथील विचारवंत आनंद पवार यांनी ‘लैंगिक पहचान की चुनोती और समानता के सवाल’ अशा दोन भागांमध्ये आपले विचार मांडले. या तीन दिवसीय 15 व्या राष्ट्रीय मिडीया संवाद कार्यक्रमाचा पहिल्या दिवसाचा समारोप गांधी तीर्थ येथील ‘खोज गांधीजी की’ ऑडिओ व्हिडीओ गाईडेड संग्राहलयाच्या अनुभूतीने झाला.


स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमतावर आज मार्गदर्शन
उद्या दि.26 नोव्हेंबर ला प्रार्थनेने सकाळचे सत्र सुरू होईल. त्यात डॉ. विश्वास पाटील ‘जगदम्बा कस्तूरबा’ यावर मार्गदर्शन करतील. दुपारच्या सत्रात दीपा सिन्हा यांचे स्त्री-पुरूष दरम्यान आर्थिक विषमता यावर महत्त्वपूर्ण संवाद होणार आहे. अरविंद मोहन याचे ‘हजार बेटियों वाले बापू’ यावर विशेष चर्चा होईल. तर चिन्मय मिश्र हे ‘बच्चों में लैंगिक पहचान की चुनौतियां’ या विषयावर मार्गदर्शन करतील. या संवाद कार्यक्रमाचा समारोप रविवारी, 27 नोव्हेंबर ला होईल.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ पंडित विद्यालयाचे पाचोरा तालुकास्तरीय शालेय विविध क्रीडा स्पर्धेत सुयश

Next Post

संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न

Next Post

संविधान गौरव दिन उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo