Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक कार्यकर्ते दानियल शेख व सईदा अशकुरा ने साखरपुड्यातच केले लग्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सामाजिक कार्यकर्ते दानियल शेख व सईदा अशकुरा ने साखरपुड्यातच केले लग्न

जळगांव(प्रतिनिधी)- उस्मानियापार्क येथील रहिवासी दानियल शेख जे एंजल फुड या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत व रोज रात्री व  दिवसा भुकेल्या लोकांना जेवण देत असतात ते दानियल शेख यांनी रविवार २२ ऑगस्ट रोजी मुगल गार्डन शिवाजी नगर येथील रिक्षाचालक सय्यद कलिम अहमद  यांची मुलगी नावे सईदा अयशकूरा बी यांच्याकडे साखरपुड्यासाठी गेले असता काही नातेवाइकांनी पुढाकार घेऊन सदर साखरपुड्याला निकाह( विवाह)मध्ये परिवर्तीत करण्यात यश मिळाले.
सदरची बाब जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी च्या निदर्शनास येताच अध्यक्ष फारुक शेख, शहराध्यक्ष सय्यद चाँद, संचालक सलीम मोहम्मद, हारून शेख, जुलकर नैन, अल्ताफ शेख यांनी मुगल गार्डन येथील मस्जिद ए असरारूल काद्रिया येथे  जाऊन प्रत्यक्ष निकाह मध्ये सहभागी होऊन वर दानियल, वधू चे वडील सैयद कलीम, वरा चे मामा सैयद आसिफ,काका इब्राहिम खान, वधूचे बंधू दानिश अहेमद, बंधू परवेज आसिफ यांचे शाल बुके देऊन अभिनंदन केले.

साखरपुड्याला आले आणि लग्न करून गेले
सामाजिक कार्यकर्ते  व रीलायेबल मोटर ड्राईव्हीग चे दानियल शेख यांना समाज कार्याची आवड सोबतच समाजामध्ये ज्या अनिष्ट प्रथा सुरू आहे त्या संपवण्यासाठी त्यांनी आपले मामा सय्यद आसिफ व काका इब्राहिम खान यांच्या कडे प्रस्ताव दिला की आजच निकाह करून वधूला आपल्या घरी घेऊन जायचे आहे. लागलीच वधूकडील मंडळी व खासकरून आत्या अमिनाबी, हसना बी, फातेमा बी, वधूचे काका सलीम सय्यद, रफिक रजवी यांनीसुद्धा त्यास होकार दिला आणि दुपारीच विवाहाच्या तयारीला सुरुवात झाली.

मस्जिद मध्ये झाला निकाह
सदरचा स्तुत्य निकाह मस्जिद ए असरारूल काद्रिया मध्ये सुन्नी जामा मस्जिद  नियामतपुराचे इमाम खतीब जाबीर हजरत यांनी खुतब ए निकाह पढवुन दुवा केली.  या निकाहा चे वकील म्हणून नंदुरबारचे पठाण असलम खान, साक्षीदार म्हणून यावल चे  शमसोद्दीन खान व शब्बीर खान रशीद खान यांनी भूमिका पार पाडली.

जळगाव शहरात उच्चशिक्षित तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते यांनी अशा विवाहाची नोंद घेऊन आपल्या नातेवाईकांचे तसेच आपल्या मित्र परिवाराचे साखरपुड्याचे मोठ मोठ्या कार्यक्रमाचे जेवणाच्या पंगतीचे आयोजन न करता लहान साखरपुड्यातच विवाहा चे आयोजन करून समाजाला एक चांगला संदेश द्यावा असे आव्हान  जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी विवाह स्थळी उपस्थितांना केले.

विवाहाला यांची सुद्धा होती संमती व उपस्थिती
एमआयएमचे महानगराध्यक्ष दानिश अहेमद, अब्दुल रहमान, सय्यद तबरेज, सय्यद परवेज, सय्यद इम्रान, शाहरुख सय्यद,  मोहसिन खाटीक, नाजीम पेंटर, समीर शेख ,वसीम  अख्तर, अबुरेहान सर, जाकिर हाजी, अब्दुल रहमान मलिक, जावेद सय्यद 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महावितरण विद्युत सहाय्यक भरतीची मेरिट यादी दहावीच्या गुणाच्या आधारेच लावा -प्रतीक सपकाळे

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात राखी बनवण्याचा उपक्रम

Next Post

प.वि.पाटील विद्यालयात राखी बनवण्याचा उपक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d