Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
..व्रतस्थाची सावली हरपली

मुंबई, दि. 16 : संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतील निष्ठावान सैनिक, उपेक्षितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविताताई रणदिवे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Maha Info Corona Website

सविताताई रणदिवे यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणतात की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना प्रत्येक पावलावर, प्रत्येक कार्यात सविताताईंनी समर्थ साथ दिली. दिनू रणदिवे साहेबांच्या बरोबरीनं त्यांचं स्वत:चं सामाजिक कामही खूप मोठं आहे. राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात वाढलेल्या सविताताईंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वाचं योगदान दिलं. दुर्बल, वंचित, शोषित, आदिवासी, कामगार वर्गाच्या हक्कांसाठी त्या जीवनभर काम करीत राहिल्या. समाजातील उपेक्षित घटकांसाठी त्या मोठा आधार होत्या. शिक्षिका म्हणून काम करतांना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मुल्ये आणि सामाजिक जाणीव रुजवण्याचं काम केलं. साधी राहणी, उच्च विचारांची परंपरा जपणाऱ्या सविताताईं या नवीन पिढीतील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आदर्श, प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या सामाजिक, पुरोगामी चळवळीतील आदर्श व्यक्तिमत्व पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

..व्रतस्थाची सावली हरपली

Next Post

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त

Next Post
पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त

पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा – विभागीय आयुक्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo