Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
19/11/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सामाजिक न्याय विभागाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मुंबई(प्रतिनिधी)- भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, विकलांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती, राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती राष्ट्रीय फेलोशिप अशा विविध योजना सुरू आहेत. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर यांनी केले आहे.शिष्यवृत्ती योजना संदर्भात विस्तृत माहिती खालीलप्रमाणे आहे.दिव्यांग विदयार्थ्यासाठी प्री मट्रिक शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता 9 वी आणि 10 वी चा समावेश आहे.

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न – 2.50 लाख आहे त्या पाल्यांना शिष्यवृतीचे दर हा डे स्कॉलरसाठी 500 रुपये दरमहा आणि वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्याकरिता 800 रुपये दरमहा शिष्यवृत्ती आणि पुस्तके अनुदान आणि विकलांग भत्ता ज्याची वार्षिक मर्यादा 2000 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत असु शकते.दिव्यांग विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती साठी इयता 11 वी पासुन मास्टर डिग्री आणि डीप्लोमा स्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न – 2.50 लाख आहे अशा पाल्यांना त्याचा लाभ घेता येईल.शिष्यवृतीचे दर पुढीलप्रमाणे आहे विविध विषयात डिग्री डिप्लोमा इत्यादीतुन संबंधित स्नातकोत्तर, स्नातक, डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता देखरेख भत्त्याचे दर विविध आहेत.

ही वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याकरिता 900 -1600 रुपये दरमहा तसेच डे स्कॉलरसाठी 550-750 रूपये दरमहा मर्यादेत ट्युशन शुल्क (अधिक वार्षिक मर्यादा 1.50 लाख रूपये) पुस्तक भत्ता आधिक विकलांग भत्ता ज्याची वार्षिक मर्यादा 2000 रुपयांपासून ते 4000 रुपयांपर्यंत असु शकते.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती मध्ये सर्वोत्कृष्टेतकरिता 241 अधिसूचीत संस्थानात स्नातक,स्नातकोत्तर डिग्री आणि डिप्लोमा या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6.00 लाख आहे, अशा पाल्यांना ही योजना लागू आहे.वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांकरिता 3000 रुपये दरमहा आणि डे स्कॉलरसाठी 1500 रुपये दरमहा देखरेख भत्ता, वार्षिक पुस्तक अनुदान यासाठी 5000 रुपये आणि वार्षिक टयुशन शूल्क 2.00 लाख रुपयांपर्यंत असेल.

उपकरणासह संगणक खरेदीसाठी खर्चाची परतफेड 30,000/- (पुर्ण कोर्समध्ये एकदा) विशिष्ट दिव्यांगत्वाशी संबंधित आवश्यक सॉफ्टवेअर सहाय्यक उपकरण खरेदीसाठी खर्चाची परतफेड-30,000/- (पुर्ण कोर्समध्ये एकदा) करता येईल.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती साठी अर्ज करण्याची पद्धत राष्ट्रीय शिष्यवृती पोर्टल माध्यमातुन कार्यान्वित केली जात आहे.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (www.scholarship.gov.in) यावर ऑनलाईन अर्ज करावा. अद्यावत माहितीसाठी कृपया http://www.scholarship.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी तसेच अर्ज सादर करण्यासाठी प्रपत्र सदर विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या बेवसाईटवर देण्यात आलेले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती साठी परदेशात असलेल्या विद्यापीठात मास्टर डिग्री आणि डॉक्टरेट डिग्री यांचा समावेश आहे.ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6.00 लाख(सहा लाख) आहे त्यांच्यासाठी यु.के. करिता 9900 पाँड (ग्रेट ब्रिटन) आणि इतर देशांसाठी 1500 युएस डॉलर वार्षिक देखरेख भत्यासह ट्युशन शुल्क, वार्षिक आपत्कालिन भता, हवाई प्रवास किंमत इत्यादी. शिष्यवृतीचे दर आहेत.

योजनेच्या अटीनुसार उमेदवाराची योग्यतेचे पात्रता आणि मूल्यांकन उमेदवार केल्यानंतर www.disabilityaffairs.gov.in या वेबसाइटवर दिलेल्या विहित अर्जामध्ये करेन.योजनेची अर्ज राष्ट्रीय वृतपत्रात जाहिरात केली जाईल आणि वेळोवेळी प्राप्त झालेल्या योजनेच्या | अजांची निवड कमिटीद्वारे निवड करून निवड समितीने निवडलेल्या उमेदवाराना योग्यतेनुसार ठेवली जाईल निवड समितीची स्थापना भारत सरकार करेल.

दिव्यांग विदयार्थ्यासाठी राष्ट्रीय फेलोशिप भारतीय विद्यापीठात एम. फील व पीएच.डी. या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न कोणतीही अधिक मर्यादा नाही. अशा पाल्यांसाठी जेआरएफ (पहिले दोन वर्ष) करिता रु.25000/- तसेच एस आर एफ करिता रु.28000/- दरमहा (तिसऱ्या वर्षापासुन अभ्यासक्रम पुर्णता अवधी संपेपर्यंत) तसेच आपत्कालिन अनुदान, एस्कोर्ट भत्ता/रिडर भत्ता, घर भाडे भत्ता इत्यादी (लागु दरात) असे शिष्यवृतीचे दर आहेत.फेलोशिपसाठी विद्यापीठ अनुदानआयोगाद्वारे निवड केली जाते.जेव्हा कधी युजीसीव्दारे अर्ज आमंत्रित करण्यात तेव्हा उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

नि:शुल्क कोचिंग साठी शासकीय सार्वजिनिक क्षेत्रात नोकरीसाठी प्रतिस्पर्धा परिक्षेत समाविष्ठ होण्यासाठी आणि तंत्रज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश हेतु यांचा समावेश आहे.ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6.00 लाख आहे.या विभागाअंतर्गत सुप्रसिद्ध कोचिंग संस्थानाला कोचिंग शुल्क द्यावे लागते. विद्यावेतन आणि विशेष विकलांग भत्ता बाह्य उमेदवारांकरिता 5000/- रुपये दरमहा तसेच स्थानिक उमेदवारांकरिता 2500 रूपये दरमहा देय शिष्यवृत्ती देय असेल.

कोचिंग संस्थानाच्या कोचिंग सुचिबद्धतेकरिता विकलांग अधिकार अधिनियम 2016 अतंर्गत नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त कोचिंग संस्था संबधित राज्यसरकार तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या शिफारशीनुसार निर्धारीत अर्जात त्यांचे प्रस्ताव पाठवू शकतात.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृती, दिव्यांग विद्याथ्र्यांसाठी पोस्ट मैट्रिक शिष्यवृत्ती, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृती. या तीनही शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय शिष्यवृती पोर्टल माध्यमा कार्यान्वित केल्या जात आहेत आणि शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभाथ्र्यांना DBT मार्फत PFMS प्रणालीद्वारे दिली जाते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली -मुख्यमंत्री

Next Post

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम

Next Post
रत्नागिरीतील रिक्त जागा लवकरच भरणार -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d