Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही; नागरिकांनी संमेलन स्थळी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा -मंत्री छगन भुजबळ

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/12/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही; नागरिकांनी संमेलन स्थळी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा -मंत्री छगन भुजबळ

नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी,आडगाव नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. काल झालेल्या पावसामुळे कुठलाही व्यत्यय निर्माण झालेला नाही. सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात कुठलीही उणीव भासणार नाही. त्यामुळे नाशिककरांनी संमेलन स्थळी येऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.

कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथील मुख्य सभामंडपाच्या कामाची, किचन, भोजन व्यवस्था, प्रमुख पाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या रूमची मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी संमेलन समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत टकले, कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, समाधान जेजुरकर, अमर वझरे यांच्यासह समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून सारस्वतांच्या स्वागतासाठी कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी ही पूर्णपणे सजली आहे. पावसाचे वातावरण जरी असले तरी संपूर्ण काळजी घेत संमेलनाच्या सर्व कार्यक्रमाची अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले आहे. हे संपूर्ण नाशिककरांचे संमेलन असून नाशिकचं नाव जागतिक पातळीवर पोहचण्यासाठी आपण या संमेलनाच्या नियोजनात कुठलीही उणीव भासणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

Team Satymev Jayate

Previous Post

मैदानी खेळांची राजधानी म्हणून नाशिकची ओळख निर्माण

Next Post

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Next Post
भूमि अभिलेख विभागातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्याकरिता प्रादेशिक निवड समितीची स्थापना

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo