जळगाव – (प्रतिनिधी) – केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वी.पाटील विद्यालय एम.जे.कॉलेज जळगाव चे शिपाई सुनील देविदास नारखेडे यांना भारतरत्न मौलाना आझाद आदर्श सेवा पुरस्कार देऊन नुकतेच गौरवण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी रजनीकांत कोठारी ,अनिल भैय्या कासट , मनोज पाटील सर ,मनोहर पाटील, शुभांगी ताई बिऱ्हाडे, अ.फ.भालेराव आदी उपस्थित होते. सुनील नारखेडे यांना या पूर्वी हजरत बिलाल तर्फे आदर्श सेवा पुरस्कार मिळाला होता त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.











