Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व. मधुकरराव चौधरींचे हरितक्रांतीचे स्वप्न रावेर लोकसभा मतदार संघात राबविणार

फैजपूर येथील स्व. चौधरींच्या पुतळ्यास अभिवादन करीत प्रचारास सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/04/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
स्व. मधुकरराव चौधरींचे हरितक्रांतीचे स्वप्न रावेर लोकसभा मतदार संघात राबविणार

फैजपूर-(प्रतिनिधी) – विधानसभेचे माजी अध्यक्ष लोकसेवक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या फैजपूर येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी अभिवादन केले. तसेच माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब स्व जे टी. महाजन यांच्या फैजपूर येथील इंजिनिअरींग कॉलेजमधील पुतळ्यास यावेळी अभिवादन करण्यात आला. स्व. मधुकरराव चौधरी यांनी रावेर तालुक्यात जलसिंचनाचे प्रकल्प बांधून पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवला आहे. स्व. चौधरी यांचा आदर्श घेऊन रावेर लोकसभा मतदार संघात शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन श्रीराम पाटील यांनी दिले. त्यानंतर यावल तालुक्यात मंगळवारी प्रचाराची सुरुवात करण्यात आली . मारुळ येथील नागरिकांशी यावेळी संवाद साधत चर्चा केली.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यात प्रचार दौऱ्यात सुरुवात झाली. यावेळी रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी , राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील, माजी जि. प सदस्य प्रभाकर सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, माजी जि प सदस्य प्रा.नीलिमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) पक्षाचे फैजपुर शहराध्यक्ष अनवर खाटीक, काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष रियाज शेख , वसीम जनाब , प्रशांत पाटील, डॉ आर वाय चौधरी, व्ही आर पाटील, एन. ए. भंगाळे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव तालुक्यात करणदादा पाटील यांच्या प्रचार रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद; ठिकठिकाणी जोरदार स्वागत

Next Post

रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

Next Post
रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

रणरणत्या उन्हातही करणदादा पाटील यांच्या प्रचाराच उत्साह शिगेला

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo