Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन चा संयुक्त उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/07/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव दि.६ प्रतिनिधी – स्वर्गीय वसंतराव चांदोरकर यांच्या (दि.८ जुलै) स्मृतिदिनानिमित्त एका वेगळ्या व अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. ९ जुलै २०२२ रोजी कांताई सभागृहामध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्ताने नुकत्याच निधन झालेल्या भारतरत्न लतादीदींनी ना प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्याचा योग आला आहे.

लतादीदींनी गायलेल्या अभिजात संगीतावर आधारित रचनांचा “घरंदाज सूर” हा दृकश्राव्य अविष्कार असणार आहे.
पुणे आकाशवाणी वर कार्यक्रम अधिकारी म्हणून सेवाव्रत असलेल्या प्रभा जोशी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना सहकार्य डॉक्टर मृणाल चांदोरकर करणार आहेत.
विख्यात गायिका लता मंगेशकर यांचा सूर म्हणजे साक्षात सरस्वतीचं मूर्त रुप.

भारतरत्न पुरस्कार प्राप्त लता मंगेशकर यांची किर्ती कित्येक वर्षांपासूनच जगभरात दरवळत राहीली. भारतीय चित्रपट संगीत क्षेत्राची ही जणु अनभिषिक्त सम्राज्ञी. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या सारख्या महान गवैया कडून संगीताचा वारसा वंश परंपरेनी मिळाला तरी लता मंगेशकर यांची दैदिप्यमान कामगिरी घडली ती चित्रपट संगीत क्षेत्रात. भारतीय शास्त्रीय संगीताच्या महान परंपरेत ज्या दिग्गज गायिका होऊन गेल्या त्यात दीदींचं नाव आलं नाही. परंतु या दिव्य सूरांनी चित्रपट संगीतातूनही घरंदाज शास्त्रीय संगीताचे सगळे आदर्श दाखवत आपली वंश परंपरा आणि गायकी सिद्ध केली. त्यांची ही वैशिष्ट्यपूर्ण गायकी सोदाहरण उलगडून दाखवणारा कार्यक्रम ‘ घरंदाज सूर ‘ चुकवू नये असा हा कार्यक्रम शनिवार दि. ९ जुलै रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता कांताई सभागृहात संपन्न होणार आहे. तमाम जळगावकर रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती दोन्ही संस्थानी केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ईच्छादेवी चौक ते डी मार्ट रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने आंदोलन

Next Post

दिव्यांग तपासणीसाठी कोणाला पैसे देऊ नका;पथनाट्यातुन दिला संदेश

Next Post
दिव्यांग तपासणीसाठी कोणाला पैसे देऊ नका;पथनाट्यातुन दिला संदेश

दिव्यांग तपासणीसाठी कोणाला पैसे देऊ नका;पथनाट्यातुन दिला संदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo