Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित सांज पाडवा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/04/2024
in जळगाव, सामाजिक
Reading Time: 1 min read
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित सांज पाडवा एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव

जळगाव दि. ७ प्रतिनिधी – चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात “गुढीपाडवा”. मराठी नवीन वर्षाचा आरंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त. गुढीपाडवा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल. या ऋतूचा आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे “सांज पाडवा” या सांगितिक मैफिलीचे आयोजनाने भाऊंच्या उद्यानात संपन्न झाला. जळगावच्या गुणी कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उद्घाटन म्हणून विकास तळेले (डेप्युटी रजिस्टर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) तसेच डॉ. मधुलिका सोनवणे (डायरेक्टर, विशारद स्किल डेव्हलपमेंट सेंटर, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) उपस्थित होते. गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी व उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुपूर खटावकर यांनी केले. नववर्षाच्या स्वागतच सुरेल प्रवासाच्या या कार्यक्रमात श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेशी, वरूण नेवे, अथर्व मुंडले तर साथसंगत केली प्रसन्न भुरे (तबला) राजेंद्र माने (संवादिनी) शुभम कुलकर्णी (मंजिरी) आणि निरूपण केले होते अनघा गोडबोले हे कलावंत सहभागी होते. कलावंतांचे सत्कार डॉ. विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे, दीपिका चांदोरकर यांनी केले.

सांज पाडव्यात ही गाणी सादर झाली
तराणा आदीदेव महादेव राग यमन याने सुरवात झाली. यानंतर अनंता तुला कोण पाहू शके, त्या फुलांच्या गंधकोशी, पांडुरंग कांती, पांडुरंग नामी लागलासे ध्यास, रुणुझुणू रुणुझुणू, तू सुखकर्ता, श्री राम चंद्र कृपाळू, हे सुरांनो चंद्र व्हा, नारायणा रमा रमणा, विश्वाचा विश्राम रे, मन मंदिरा, दिल की तापीश, मी राधिका, बाजे मुरलीया,भैरवी अवघा रंग एक झाला यानंतर धन्य भाग सेवा का याने उत्तरोत्तर रंगलेल्या सांज पाडवा मैफिलीचा समारोप झाला.

Team Satymev Jayate

Previous Post

जैन हिल्स येथे आगम वाचना शिबीर आरंभ

Next Post

जळगाव विधानसभा मतदारसंघातील 2191 कर्मचाऱ्यांनी घेतले लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण

Next Post
जळगाव विधानसभा मतदारसंघातील 2191 कर्मचाऱ्यांनी घेतले लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण

जळगाव विधानसभा मतदारसंघातील 2191 कर्मचाऱ्यांनी घेतले लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo