Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना म्हाडा योजनेत प्राधान्याने हक्काचा निवारा मिळवून देणार – आमदार मंगेश चव्हाण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना म्हाडा योजनेत प्राधान्याने हक्काचा निवारा मिळवून देणार – आमदार मंगेश चव्हाण

पत्रकार दिनी पार पडला चाळीसगाव तालुक्यातील पत्रकारांचा सपत्नीक सत्कार सोहळा,

पत्रकारांच्या होम मिनिस्टर यांना सोहळ्याचा व्यासपीठावर स्थान,

आ.मंगेश चव्हाण मित्र परिवार आणि शिवनेरी फाऊंडेशनचा उपक्रमाने पत्रकारही भारावले,

चाळीसगाव दि.६ : पत्रकारिता करतांना पत्रकारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते, डिजिटल मिडियामुळे आज पत्रकारितेच्या व्याख्या बदलल्या असल्या तरी पत्रकारांच्या ज्या समस्या पूर्वी होत्या त्याच आज देखील कायम आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवाना त्यांच्या हक्काचे पत्रकार भवन मिळावे तसेच जेष्ठ पत्रकार यांनी केलेल्या सूचना व त्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आगामी काळात सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वतःचे घर नसलेल्या पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी नवीन म्हाडा योजनेत अल्पदरात प्राधान्याने घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी घोषणा चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली, ते शिवनेरी फाउंडेशन तर्फे पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित चाळीसगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सपत्नीक सत्कार सोहळ्यात बोलत होते.


चाळीसगाव येथील आमदार मंगेश चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात आयोजित या सत्कार सोहळ्याला पत्रकार बांधवांना संसारात खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती यांना व्यासपीठावर स्थान देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण व सौ.प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते चाळीसगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सपत्नीक सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष आर डी चौधरी, सचिव एम बी पाटील, रमेश जानराव, जिजाबराव वाघ, आनंद खरात, अजय कोतकर, देविदास पाटील, संजय सोनार, सोनार काका, मोतीलाल अहिरे, मनोहर कांडेकर, मुराद पटेल, रामलाल चौधरी, प्रशांत गायकवाड, सूर्यकांत कदम, गणेश पवार, निलेश परदेशी, राजेंद्र डी.चौधरी, खुशाल बिडे, आकाश धुमाळ, रणधीर जाधव, संदीप पाटील, सुनील राजपूत, विजय सपकाळे, सोमनाथ माळी, विशाल कारडा,निलेश परदेशी, तारकेश्वर परदेशी, अजीज खाटिक, महेंद्र सूर्यवंशी, जीवन चव्हाण, यश पालवे,  यांच्यासह चाळीसगाव शहर व तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते .


आमदार चव्हाण पुढे म्हणाले की, १५ ते २० वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता पूर्णपणे बदलली असून आजच्या डिजिटल युगात ब्रेकिंग न्यूज क्षणात वाऱ्यासारखी पसरते. माझे मामा एम बी पाटील स्वतः पत्रकार असल्याने त्याकाळातील चाळीसगाव शहरातील जुने पत्रकार व त्यांचे काम जवळून पाहता आले आहे. मी जळगाव येथे डिप्लोमा साठी अपडाऊन करायचो तेव्हा त्यांची बातम्यांची पाकिटे घेऊन ती सबंधित दैनिकाच्या कार्यालयात जमा करायचो. तेव्हाचे तरुण पत्रकार आता जेष्ठ झालेत मात्र त्यांनी ज्या हाल अपेष्ठा सहन करून एक वैचारिक पत्रकारिता चाळीसगाव तालुक्यात जतन केली आहे त्याचा आदर्श आताच्या तरुण पत्रकार बांधवानी घ्यावा, किंबहुना मी जर चांगले काम केले असेल तर त्याला चांगले म्हणा पण मात्र मी कुठे चुकत असेल तर माझ्याविरुद्ध लिहायला सुद्धा मागेपुढे पाहू नका अशी भावना देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.


      दरम्यान चाळीसगाव तालुक्यात पत्रकार बांधवांचा सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम प्रथमच आ.मंगेश चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चव्हाण यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता. याबद्दल सर्व पत्रकार बांधवांनी आ.मंगेश चव्हाण व सौ.प्रतिभा चव्हाण यांचे आभार मानले.
या आगळ्या वेगळ्या सत्कार सोहळ्यात पत्रकार आर डी चौधरी, भिकन वाणी, आनंद खरात यांनी मनोगताच्या माध्यमातून पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या मागण्या आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मांडल्या.
प्रास्ताविक भावेश कोठावदे यांनी केले व  सूत्रसंचालन जितेंद्र वाघ यांनी केले तर आभार सौ.प्रतिभा चव्हाण यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना संक्रमणामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय – पालकमंत्री जयंत पाटील

Next Post

जळगाव जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

Next Post
जळगाव जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo