Tuesday, October 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वस्त धान्य दुकानांच्या वेळा निश्चित नागरीकांनी धान्य घेतांना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 16 – अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाथार्थ्याना तसेच एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांसाठी कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत शासनाने आधी घोषित केल्याप्रमाणे एप्रिल, मे आणि जुन, 2020 चे धान्य एकत्रितपणे मिळणार होते. परंतु आता नवीन निर्देशानुसार या तीनही महिन्यांचे धान्य त्या-त्या महिन्यातच वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.
माहे एप्रिल-2020 करीता अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना विहीत अन्नधान्य रास्त भाव दुकानातून देण्यात आले आहे. याच लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत तांदूळ देखील माहे एप्रिलकरीता उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर माहे मे आणि जुनकरीता अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना विहीत अन्नधान्य आणि मोफत तांदूळ माहे मे आणि जूनमध्ये उपलब्ध होणार आहे.
ज्या लाभार्थ्यांचे अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनांच्या लाभार्थी यादीत नाव नाही अशा केशरी शिधापत्रिकाधारकांना देखील आता माहे मे आणि जुनमध्ये 8 रुपये प्रति किलो दराने गहू, प्रती सदस्य 3 किलो आणि 12 रुपये प्रति किलो दराने तांदूळ, प्रती सदस्य 2 किलो असे एकूण 5 किलो धान्य प्रति सदस्यास मिळणार आहे. सदरचे धान्य हे मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात संबंधित रास्त भाव दुकानातून उपलब्ध होणार आहे. तसेच माहे जुनमध्ये देखील याचप्रमाणे अन्नधान्य मिळणार आहे.
पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटपासाठी सर्व स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व दुपारी 4ते रात्री 10 वाजेपर्यंत उघडी रहातील. तेव्हा लाभार्थ्यांनी आपआपले धान्य घ्यायला जातांना गर्दी न करता मर्यादित अंतर राखूनच स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर माल वाहतुक करणा-या वाहनांमध्ये इंधन भरण्यास वेळेचे बंधन नाही

Next Post

हरीपाठ व ज्ञानेश्वरी वाचून वेळ सत्कारणीत लावा-अनिल महाराज

Next Post
हरीपाठ व ज्ञानेश्वरी वाचून वेळ सत्कारणीत लावा-अनिल महाराज

हरीपाठ व ज्ञानेश्वरी वाचून वेळ सत्कारणीत लावा-अनिल महाराज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo