Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने समाजकार्य महाविद्यालयात “जोडीदाराची विवेकी निवड” या विषयावर कार्यशाळा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/01/2024
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने समाजकार्य महाविद्यालयात “जोडीदाराची विवेकी निवड” या विषयावर कार्यशाळा संपन्न

जळगाव – (प्रतिनिधी) – स्वामी विवेकानंद जयंती तसेच राजमाता जिजाऊ जयंती च्या निमित्ताने जोडीदाराची विवेकी निवड या विषयावर लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे विद्यार्थी विकास विभाग, युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती अभियान द्वारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

जोडीदाराची निवड विचारपूर्वक करणे आवश्यक : आरती नाईक
आपल्या जोडीदाराची निवड डोळसपणे व पूर्ण विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे. आपल्या स्वभावाप्रमाणे जोडीदार निवडताना अवास्तव अपेक्षा वा भ्रामक समजूती टाळायला हव्यात. अनेक पालकांचा असा गैरसमज असतो की एकदा लग्न झालं की पुढच्या गोष्टी आपोआप चांगल्या होतील. पण त्यामुळे लग्न झालेल्या व्यक्तींना आयुष्यभर त्रास सहन करावा लागू शकतो, असे प्रतिपादन राज्य महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह आरती नाईक यांनी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या वतीने दि. १२ जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते १४ फेब्रुवारी (जागतिक प्रेम दिन) दरम्यान राज्यव्यापी युवा संकल्प अभियान राबविण्यात येते. या अभियानाचे उद्घाटन जळगावमधील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात युवती सभेच्या अंतर्गत करण्यात आले.

मंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे *प्राचार्य डॉ. राकेश चौधरी* होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र *अनिसचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे*, पनवेल येथील महिला विभागाच्या राज्य *कार्यवाह आरती नाईक*, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभागाचे राज्य कार्यवाह *प्रा. डी. एस. कट्यारे*, महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी *डॉ. जुगल घुगे* उपस्थित होते.

प्रस्तावनेमधून कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती महिला कार्यक्रमाधिकारी *प्रा. डॉ. कल्पना भारंबे* यांनी दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते फीत कापून *’विवेकी कुंडली’* चे उद्घाटन करण्यात आले. *माधव बावगे* यांनी सांगितले की, तरुण मुलामुलींना विवाह करण्याबाबत प्रचंड गोंधळ असतो. विवाह करण्याआधी काही योग्य बाबींचा विचार विनिमय वधू-वरांनी वेळेवर लग्नाआधी करायचा असतो. त्यानंतर वैवाहिक आयुष्य सुंदर जगता येते, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षस्थानावरून प्राचार्य राकेश चौधरी यांनी, आयुष्य विवेकी आणि सदविचाराने जगता येते. त्यासाठी सकस वाचन, महापुरुषांचा आदर्श ठेवणे महत्त्वाचे आहे. युवा पिढी अनेक विषयांमुळे भरकटत चालली आहे. मात्र योग्य दिशा मिळाली तर निश्चितच तरुणांच्या आयुष्याचे सोने होईल, असे प्रतिपादित केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ नितीन बडगुजर यांनी केले तर आभार डॉ. जुगल घुगे यांनी मानले.

यावेळी महाराष्ट्र अनिसचे जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बोऱ्हाडे व विश्वजीत चौधरी, जोडीदाराची विवेकी निवड विभागाच्या जिल्हा कार्यवाह मीनाक्षी चौधरी, शहर शाखा कार्याध्यक्षा कल्पना चौधरी, शिरीष चौधरी, जितेंद्र धनगर आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

लोकसहभागाने गाव विकास आराखडा तयार करावा – ना. अनिल दादा पाटील

Next Post

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आरोग्य व औषधोपचार शिबिर संपन्न

Next Post
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आरोग्य व औषधोपचार शिबिर संपन्न

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आरोग्य व औषधोपचार शिबिर संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d