Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हजेरी सहायकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार -रोहयोमंत्री संदिपान भुमरे

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
21/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई(प्रतिनिधी)- हजेरी सहायकांच्या पेन्शनसह विविध मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार करणार असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.मंत्रालयात रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांविषयी विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, किसन कथोरे, माजी आमदार विजय गव्हाणे, रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, नरेगा आयुक्त शंतनु गोयल, जालना जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत रोजगार सहायकांच्या सेवानिवृत्ती, शासकीय सेवेत नियमित करणे, रूजू झालेल्या तारखेपासून सेवा गृहीत धरावे, अशा विविध मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शक्य असणाऱ्या मागण्यांवर लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. काही विषय न्यायप्रविष्ट असल्याचेही श्री. भुमरे यांनी यावेळी सांगितले.

सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा उपलब्ध व्हावा. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा. यासाठी दोन विहीरीमधील अंतर कमी करण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे श्री.भुमरे यांनी सांगितले.यावेळी रोजगार हमी योजना अंतर्गत करण्यात येणाऱ्या जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यातील कामांचा रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांसाठी संबंधित अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना कामे उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश श्री.भुमरे यांनी दिले.

Team Satymev Jayate

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

ई-पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा -महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Next Post

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश

Next Post
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात एकूण ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करणार -पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d