Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हातपंप व विजपंप देखभाल कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी होणार;मंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपुर्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2025
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
हातपंप व विजपंप देखभाल कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी होणार;मंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपुर्ती

जळगाव-( प्रतिनिधी) – ग्राम विकास व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय दि. 31.03.1978 व दि. 30.07.1981 नुसार हातपंप /विद्युतपंप देखभाल व दुरुस्ती योजनेची प्रशासकीय यंत्रणा ठरवुन जिल्हा परिषदेला कनिष्ठ अभियंता (यां) , हातपंप यांत्रिकी, विजतंत्री, मदतनीस या सवंर्गातील पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर मंजुर करुन ती भरण्यात येवून त्यांचे वेतन व भत्त्याचा खर्च जिल्हा परिषदेतील देखभाल व दुरुस्ती निधीतुन / ग्रा.प.कडील प्राप्त वसुलीतुन भागविण्यात येत होता. परंतु जिल्हा परिषदेच्या अत्यल्प उत्पन्नातुन सदरील कर्मचा-यांचा वेतन व भत्त्यांचा खर्च भागविण्यास आर्थिक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे हातपंप /विजपंप देखभाल व दुरुस्ती कर्मचा-यांना हलाकीचे जीवन जगावे लागत होते. 40 वर्षापासुन प्रलंबित असलेला प्रश्न पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातुन जिल्हा परिषद अंतर्गत राज्यातील हातपंप/विजपंप देखभाल व दुरुस्ती करीता कार्यरत नियमित कर्मचा-यांच्या व नियमित पदावरुन सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या वेतन, व सेवानिवृत्ती वेतन व भत्त्यांचे दायीत्वाबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे, ५ जुलै २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या तसेच नियमित पदांवरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनचे दायित्व शासनाने स्वीकारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

त्या अनुषंगाने एकुण 1074 हातपंप/विजपंप यंत्रणेतील कर्मचा-यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतनाचे दायीत्व शासनाने दिनांक 09 ऑगस्ट 2024 पासुन स्विकारलेले असून प्रथम टप्प्यात शासन निर्णय दिनांक 4 जुन 2025 अन्वये एकुण 32 जिल्हा परिषदेकरीता माहे मार्च ते मे-2025 पर्यतचा एकुण 920.30 लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला होता. आता नुकतेच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोंबर 2025 अन्वये 1011.59 लक्ष निधी जिल्हा परिषदांना वितरीत करण्यात आलेला असून ठाणे, पालघर, रत्नागिरी, कोल्हापुर ,जालना, अमरावती जिल्ह्यांनाही लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत ८ ऑक्टोंबर रोजी नोकरीच्या संधी

Next Post

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo