Wednesday, March 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

४२ दिवसांनी जिल्हाअंतर्गत एसटीचा प्रवास सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
४२ दिवसांनी जिल्हाअंतर्गत एसटीचा प्रवास सुरु

हैद्राबादला अडकलेल्या मजुरांना घेऊन एसटी तालुक्याला रवाना

चंद्रपूर ,दि. 10 मे : बेचाळीस दिवसांच्या लॉकडाऊन नंतर आंध्रप्रदेश व तेलंगाना राज्यात अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यातील विविध भागात घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाची पहिली बस चंद्रपूर आगारातून आज रवाना झाली. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा अंतर्गत बस सुरू करण्याची सूचना केल्यानंतर महामंडळाच्या बसेसची थांबलेली चाके गतिशील झाली.

Maha Info Corona Website

तेलंगाना राज्यातून हैदराबाद येथून चंद्रपूर जिल्ह्यातील अडकलेल्या मजुरांना घेऊन त्या राज्याची बस आज चंद्रपूर एसटी स्टॅन्डला आली. त्यामुळे हैद्राबाद वरून चंद्रपूरला पोहोचलेल्या मजुरांना पुढे कसे जावे हा प्रश्न होता. पालकमंत्री कार्यालयाशी त्यांनी संपर्क साधल्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना सूचना केली. त्यानंतर सिंदेवाही, नागभीड, मूल, ब्रह्मपुरी तालुक्यांच्या गावाला जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. सोमवारपासून राज्य शासनाने मजुरांना एसटी बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आज रविवारीच हे मजूर चंद्रपूरमध्ये पोहचल्यामुळे 26 जणांच्या ताफ्याला मूल, सिदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी येथे रवाना करण्यात आले.

तत्पूर्वी, गेल्या अनेक दिवसांपासून आगारात जमा असलेल्या एसटी बसेसचे सॅनीटायझेशन करण्यात आले. तसेच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रवाशांना देखील आवश्यक वैद्यकीय सल्ला व शारीरिक अंतर राखण्याचे निर्देश दिले गेले. केवळ 26 नागरिकांना या बसमधून रवाना करण्यात आले.

यावेळी प्रवाशांना शुभेच्छा देण्यासाठी आगार व्यवस्थापक सचिन डफळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक किरण नागापुरे, तहसीलदार निलेश गौंड, नगरसेवक नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, प्रकाश तोळकर, शेखर उईके आदी उपस्थित होते. नगरसेवक नंदू नागरकर यांनी यावेळी या प्रवाशांची खानपाणाची व्यवस्था केली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गरीब व गरजू लोकांना होणार धान्य किटचे वाटप

Next Post

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांची साथ आवश्यक – पालकमंत्री

Next Post
कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांची साथ आवश्यक – पालकमंत्री

कोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांची साथ आवश्यक – पालकमंत्री

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d