Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

५ रोजी भडगांव शहरासह तालुक्यातील नागरीकांनी कायदा व सुव्यवस्था राखावी -पो.नी. धनंजय येरुळे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
५ रोजी भडगांव शहरासह तालुक्यातील नागरीकांनी कायदा व सुव्यवस्था राखावी -पो.नी. धनंजय येरुळे

भडगाव(प्रमोद सोनवणे)- शहरासह  तालुक्यातील नागरिकांना दिनांक ५ रोजी शांतता राखण्याचे आवाहन भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्यावतीने करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर असे की, दिनांक ५ रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिराचा शिलण्यास भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राममंदिर हा समस्त हिंदू धर्माचा आस्थेचा विषय आहे. हिंदू धर्म हा शांततेचा, समतेची, बंधुत्वाची, न्यायाची शिकवण देणारा धर्म आहे.  सध्या संपूर्ण जग हे कोरोना नावाच्या जागतिक महामारी सोबत एकजूट होवून लढा देत आहे. या लढ्यात सर्व मानव जात धर्म, वंश, आपसातील मतभेद विसरून एकत्र येऊन लढत आहे. आपण कोरोना विरोधात एकजूट दाखवली नाही तर कदाचित कोरोना पुढील काळात आपला नायनाट करेल यात शंका नाही. या महामारी सोबत लढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सीआरपीसी १४४ आदेशाने विनामस्क फिरणे, कोणतेही धार्मिक, सामाजिक, उत्सव करिता एकत्र येऊन करण्यास मनाई केली आहे. अत्यावश्यक बाबी खेरीच विनाकारण प्रवास, फिरणे, बाहेरगावी जाणे याला देखील बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा येथे नागरिकांना प्रवेश बंद केला आहे. तसेच मंदिरे, मशिदी, दर्गा, गुरूद्वारा,चर्च  येथे कोणत्याही धार्मिक प्रयोजन करिता नागरिकांना एकत्र येऊन आरती, पूजा अर्चना यांवरही बंदी घालण्यात आली आहे. तरी आपण सर्वांनी कायद्याचा सन्मान करत दिनांक ५ रोजी कोणत्या बाबी टाळाव्यात अशी नियमावली जनहितार्थ जारी करण्यात आली आहे. यामध्ये दोन जाती जमाती धर्म यात वैर निर्माण होईल असे कोणतेही लिखाण, चित्र सोशल मीडियावर शेअर करू नये. आनंद उत्सव साजरा करताना फटाके, ढोल, लाऊस्पिकर उपयोग करू नये. सार्वजनिक मंदिर, सभागृह, चौक येथे आरती व धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात येवू नये. शक्यतो कामाव्यतिरिक्त घराबाहेर पाडण्याचे टाळावे. व्हॉट्सअप, फेस बुक, सोशल मीडिया माध्यमातून कोणतीही आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडिओ प्रसारित झाल्यास त्यास ग्रुप अँडमिनला प्रथमतः जबाबदार धरण्यात येईल, तरी वरील बाबी टाळण्याकरीता दिनांक ५ रोजी ग्रुप अँडमिनने ग्रुप एका दिवसासाठी सेटिंग करुन बंद करावा. दिलेल्या सूचनांचे काटेकोर पणे पालन करावयाचे आहे. वरील सुचनेकडे दुर्लक्ष करून वरील कारणाने कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित विरोधात भादवी क १८८,२९५ अ, १५३, २६८, २७२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल. असे भडगाव पोलिस स्टेशनच्या वतीने कळवीण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यातुन उत्कृष्ट तलाठी म्हणून राहुल पवार यांची निवड

Next Post

दिगंबर देवांग यांची जि.प.माध्यमिक विभागात “उपशिक्षणाधिकारी” म्हणून नियुक्ती

Next Post
दिगंबर देवांग यांची जि.प.माध्यमिक विभागात “उपशिक्षणाधिकारी” म्हणून नियुक्ती

दिगंबर देवांग यांची जि.प.माध्यमिक विभागात "उपशिक्षणाधिकारी" म्हणून नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo