लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)

दिनांक 31ऑक्टोबर 2026 रोजी द वर्ल्ड स्कूल पाचोरा येथे 54 वे पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले… या विज्ञान प्रदर्शनाचे अध्यक्ष द वर्ल्ड स्कूल शाळेचे संस्थापक श्री.विलासराव बिडकर होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव लोकसभाचे खासदार मा.श्रीमती स्मिताताई वाघ उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमासाठी श्री.के.बी.अंजने (गटविकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा), श्री.विजय.एस. पवार (गटशिक्षण अधिकारी पाचोरा) श्रीमती.सरोज गायकवाड (शा.पो.आ. अधिक्षिका पाचोरा),श्री.निलेश ताडे (शिक्षण विस्तार अधिकारी पाचोरा) लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख,श्री. रामराव पाटील सर , पाचोरा तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत पार पडले . डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा शाळेतून इयत्ता सहावी ते आठवी गटातून दीप्ती नवल माळी व कल्याणी योगेश धनगर या विद्यार्थिनींचे उपकरण आपत्ती व्यवस्थापन फ्लोटिंग होम हे होते. आणि ते इयत्ता सहावी ते आठवी माध्यमिक गटातून प्रथम आले.या उपकरणाची निवड जिल्हास्तरावर झाली आहे.आणि इयत्ता 9वी ते 12वी या गटातून रुचिता कैलास चौधरी आणि समृद्धी सागर कासार यांनी फ्लड अलर्ट आणि स्मार्ट इरिगेशन हे उपकरण सादर केले होते. त्यांना सहभागा साठी प्रमाणपत्र मिळाले. लोहारा शाळेने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्साह पूर्वक सहभाग नोंदवला… सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व विज्ञान शिक्षक एन एस चौधरी सर एन व्ही बोरसे सर आर एन कुमार सर के पी जोशी सर आर जी बैरागी सर व्ही टी पाटील सर या सर्वांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासो पी एम सुर्वे उपमुख्याध्यापक आर जी बैरागी सर पर्यवेक्षक व्ही व्ही पाटील सर संस्थेचे चेअरमन दादासो संजयराव भास्करराव गरुड प्र चेअरमन काकासो सागरमलजी जैन व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शामराव शेळके सचिव यु यु पाटील सर संस्थेचे सर्व संचालक मंडळ स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण विश्वासराव आनंदराव पाटील उपाध्यक्ष अ अ पटेल सर स्थानिक सल्लागार समिती सदस्य या सर्वांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केलेले आहे यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत








