Friday, January 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

७७आरसीसी स्थापन करुन रोटरी स्टार्सने घडविला इतिहास -प्रांतपालांचे प्रतिपादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
30/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(चेतन निंबोळकर)- येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स या नव्याने स्थापन झालेल्या क्लबने अवघ्या ४०दिवसात ७७रोटरी कम्युनिटी कॉर्पस (आरसीसी) स्थापन करुन एकाच दिवशी एकाच ठिकाणी सर्वांचे पदग्रहण केले. हा विक्रम असून यामुळे नवा इतिहास घडला आहे असे रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी प्रतिपादन केले. समारोप प्रसंगी राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. पाळधी येथील सुगोकी लॉन्सच्या सभागृहात झालेल्या पदग्रहण सोहळ्यात भामरे बोलत होते. व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट आरसीसी चेअरमन प्रदीप बच्छाव, डिस्ट्रक्ट सेक्रेटरी राकेश गिडवाणी, सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके, माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, माजी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लक्ष्मीकांत मणियार, डॉ.निलेश चांडक, रोटरी स्टार्सचे अध्यक्ष सागर मुंदडा, मानद सचिव करण ललवाणी, प्रकल्पप्रमुख धनराज कासट आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रांतपाल भामरे यांनी रोटरीने गाव दत्तक घेऊन आर.सी.सी. स्थापन करुन शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून जलसंवर्धन, पर्यावरण रक्षणाबरोबर ग्रामविकासाचे कार्य करावे असे आवाहन करुन रोटरी स्टार्स ने या विक्रमासोबत कार्यात सातत्य ठेवावे असेही सांगितले. सहप्रांतपाल डॉ. फिरके, प्रदिप बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले.

अनेक ग्रामस्थांनी भावना व्यक्त करीत रोटरी स्टार्सच्या सागर मुंदडा, धनराज कासट आणि डॉ. तुषार फिरके यांचे आभार व्यक्त केले. सर्व ७७गावांमधील आरसीसीच्या प्रत्येकी ७७सदस्यांना क्लबचे प्रमाणपत्र देऊन प्रांतपाल व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विशेष सहकार्य करणारे गोपाल कासट, सुनील मुंदडा, एरंडोल पं.स.उपसभापती अनिल महाजन, भाऊसाहेब पाटील, भगवान कोळी, प्रकाश पाटील आदींचा सत्कार करण्यात आला. समारोप भेटीप्रसंगी ना.गुलाबराव पाटील यांनी रोटरी स्टार्सच्या कार्यात सहकार्याची ग्वाही दिली. प्रास्ताविक अध्यक्ष सागर मुंदडा यांनी तर सुत्रसंचालन डॉ. गोविंद तापडिया यांनी केले आहे. कार्यक्रमात सहप्रांतपाल अनिल एम अग्रवाल, विलास पाटील, चेतन पाटील, डॉ. राजेश पाटील, राजीव बियाणी, रोटरी वेस्ट अध्यक्ष डॉ. सुशिल राणे, मानद सचिव सुनिल सुखवाणी, रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष कॅप्टन मोहन कुलकर्णी, रोटरी मिडटाऊनच्या अध्यक्षा डॉ.उषा शर्मा, मानद सचिव डॉ. विवेक वडजीकर, रोटरी गोल्डसिटीचे अध्यक्ष संजय दहाड आदि मान्यवरांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी रोटरी स्टार्सच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आय.पी.इन्वेस्टिगेशन कडून नकली संभाजी बिडी व ३०नंबर बिडी वर छापा टाकून बनावट माल हस्तगत

Next Post

के.के.उर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कालेज मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

Next Post

के.के.उर्दू गर्ल हायस्कूल व ज्यू कालेज मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d