Sunday, December 7, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ॲड.अरुण चव्हाणांच्या RTI मुळे लोणवाडी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर; डस्टबिन खरेदीच्या खर्चावर प्रश्न विचारताच तीन दिवसांत काम पूर्ण!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2025
in जळगाव, माहितीचा अधिकार २००५, सामाजिक
Reading Time: 1 min read
ॲड.अरुण चव्हाणांच्या RTI मुळे लोणवाडी ग्रामपंचायत ॲक्शन मोडवर; डस्टबिन खरेदीच्या खर्चावर प्रश्न विचारताच तीन दिवसांत काम पूर्ण!

लोणवाडी, ता. जळगाव –(प्रतिनिधी)- तालुक्यातील  लोणवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात माहितीच्या अधिकाराचे (RTI) शस्त्र प्रभावी ठरले असून, एका जागरूक अर्जदाराने अर्ज दाखल करताच अवघ्या तीन दिवसांत ग्रामपंचायतीने गावात कचरा संकलनासाठी डस्टबिन (Dustbin) बसवले आहेत. ग्रामस्थांनी या जलद कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

ॲड. अरुण शिवाजी चव्हाण यांनी मागणी केलेली माहिती-  लोणवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन गावात डस्टबिन बसविण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे, याबाबत सविस्तर माहिती मिळावी, जसे की,

१)  सदर काम कोणत्या निधी अंतर्गत करण्यात आलेले आहे, यासाठी प्राप्त निधी व खर्च निधी, बाबत माहिती मिळावी.

२)  डस्टबिन खरेदी प्रक्रियेची माहिती बिले व अदा केलेली देयके सह मिळावी.

३)   डस्टबिन गावात कोण-कोणत्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या आहेत त्याबाबत चे Google Location सह Latitude & Longitude चे फोटो मिळावेत.

४)  डस्टबिन खरेदी बाबत ग्रामपंचायत ठरावाची प्रत मिळावी,  या माहितीची मागणी करताच तीन दिवसांतच लोणवाडी ग्रामपंचायतीकडून गावात कचरा संकलनासाठी डस्टबिनची सोय करण्यात आलेली आहे.

अशी माहिती मिळण्याकामी दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी लोणवाडी ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकाराचा अर्ज (RTI Application) दाखल केला होता. ग्रामपंचायतीने या कामासाठी निधी खर्च करण्यात आलेला होता परंतु प्रत्यक्षात गावात काम झालेले नसल्याचे अर्जदार यांच्या लक्षात आल्याने व गावातील कचरा संकलनाची व्यवस्था योग्य नसल्यामुळे अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून येत होत्या. अर्जदाराने माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून वरील माहिती मागितली होती. अर्ज दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच म्हणजेच ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लोणवाडी गावात विविध ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी आवश्यक डस्टबिन बसवण्यात आले आहेत.

माहिती अधिकाराचा अर्ज प्राप्त होताच ग्रामपंचायतीने दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद असून, यामुळे गावातील कचरा व्यवस्थापनाच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्येवर त्वरित तोडगा निघाला आहे. ॲड. चव्हाण यांच्या माहिती अधिकाराच्या प्रभावी वापरामुळे गावात स्वच्छता राखण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयामुळे लोणवाडी गावात आता सार्वजनिक ठिकाणी जमा होणारा कचरा योग्यरित्या संकलित करण्यास मदत होणार असून, यामुळे निश्चितच गाव पातळीवरील स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यास हातभार लागणार आहे.

 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

अपंग कल्याण निधी गैरवापर प्रकरणात लोहारा सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांना मोठा दिलासा! ग्रामविकास मंत्र्यांकडून अपात्रतेचा निकाल रद्द

Next Post

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

Next Post
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शनात प्रकाश सावल्यांची जुगलबंदी!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

‘वीर एकलव्य’ संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रा. डॉ. शाम सोनवणे!

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात 14 नोव्हेंबर बालक दिन कार्यक्रम संपन्न

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

नाशिकात मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर हल्ला;मनपाचे दुर्लक्ष उघड-नागरिक भयभीत

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d