Tuesday, June 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल ६ महिन्यांपेक्षा प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तात्काळ करा- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 9:- अनुसूचित जाती-जमाती  प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा. विशेषत: 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीतील प्रलंबित गुन्ह्यांच्या तपासाचे काम तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज  जिल्हाधिकारी कार्यालयातील  सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत  दिल्या.

            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, सरकारी अभियोक्ता ॲङ केतन ढाके, समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे  सहाय्यक आयुक्त योगेश पाटील,  जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प संचालक पी.सी.शिरसाठ, जळगाव मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस.पी.आहिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम, नागरी हक्क समितीचे पोलीस निरीक्षक पी.एस.सपकाळे, महिला बाल विकास कार्यालयातील तसेच समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी  डॉ. अविनाश ढाकणे पुढे म्हणाले की, न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन सदरची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत. विशेषत: सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून  प्रलंबित प्रकरणे निकाली काढून   पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. पोलीस तपासावरील प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा. अत्याचार पिडितांना नियमानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना बैठकीत दिल्यात.

प्रारंभी  समाज कल्याण‍ विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी माहे जुन अखेरचे 31 व जुलै मधील 27 असे एकूण  58 गुन्हे पोलीस तपासावर असून  जून व जूलै -2019 अखेर 58 प्रकरणांमध्ये  32  पिडीतांना अर्थसहाय्य मंजुर करण्यात आले आहे. तसेच जून- 2019 मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर  13  तर दोषारोप दाखल झाल्यानंतर 1 असे एकूण 14 पिडीताना 12 लाख 37 हजार 500 रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. जुलै- 2019 मध्ये एफआयआर दाखल झाल्यानंतर 16 पिडीतांना व दोषारोप दाखल झालेल्या 2 पिडीतांना असे एकूण 18 पिडीतांना रुपये 6 लाख 50 हजारांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती बैठकीत दिली.

सरकारी अभियोक्ता ॲङ केतन ढाके यांनी एफआयआर दाखल करणे आणि तपासासंदर्भात पोलीस आणि संबंधित विभागांना मार्गदर्शनपर सूचना केल्यात. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी प्रकरणनिहाय गुन्ह्यांचा़ आढावा घेवून प्रकरणे लवकरात-लवकर निकाली काढून पिडीतांना तात्काळ न्याय देण्याच्या सक्त सूचना सर्व संबंधितांना दिल्यात.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वयंरोजगारास प्राधान्य दिल्यास कुटुंबाची प्रगती शक्य -अनिल पाटील

Next Post

बार्टीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकासह मिळाले विद्यावेतन

Next Post

बार्टीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकासह मिळाले विद्यावेतन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

फालीच्या अधिवेशनाचा जैन हिल्स येथे समारोप

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo