Tuesday, May 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करा -जिल्हाधिकारी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
24/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read
हतनूर धरणातून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 75 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार -जिल्हाधिकारी

जळगाव(जिमाका)- पिडीतांना जलदगतीने न्याय देण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करावा. अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या.

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, जिल्हा सरकारी अभियोक्ता केतन ढाके, नागरी हक्क संरक्षण विभागाच्या श्रीमती कल्याणी पाटील, आदिवासी विकास विभागाचे डी. बी. चौधरी, जिप समाज कल्याण विभागाचे आर. आर. बारी, सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदि उपस्थित होते.

पिडीतांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहू नये याकरीता पोलीस विभागाने आवश्यक ते नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी दिल्या होत्या. या बैठकीमध्ये श्री. राऊत यांनी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन पिडितांना नियमानुसार अर्थसहाय्य तातडीने मंजूर करण्याच्याही सूचना दिल्यात.

प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी माहे जुलैअखेर अनुसूचित जातीची 7 तर अनुसूचित जमातीची 6 असे एकूण 13 गुन्हे पोलीस तपासावर असल्याची माहिती बैठकीत दिली. त्यापैकी 7 गुन्ह्यांची निर्गती पोलीस विभागाने केली आहे. उर्वरित 6 व ऑगस्टमध्ये नव्याने दाखल झालेले 6 असे एकूण 12 गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे सांगितले. ऑगस्ट महिन्यात 11 पिडीतांना 15 लाख 43 हजार 750 रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री. पाटील यांनी बैठकीत दिली.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत 37 (1) (3) कलम जारी

Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

Next Post
जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसह घरगुती नळ जोडणीची कामे कालमर्यादेत पूर्ण करावी -पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

अंगारकी चतुर्थीनिमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा!;प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा– प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

निधन वार्ता – रमेश प्रभाकर नाईक यांचे निधन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d