जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालय कोविड काळात घेतलेल्या आंदोलन प्रकरणात सर्व १२ आरोपींची निर्दोष सुटका करत न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणात आरोपींच्या बाजूने लढा देत ॲड. आनंद मुजुमदार यांनी सादर केलेला ठोस आणि कायदेशीर युक्तिवाद न्यायालयास प्रभावी ठरला.


न्यायमूर्ती व्ही. एम. देशमुख यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत, ॲड. मुजुमदार यांनी दाखवून दिले की —

“सदर आंदोलनावेळी कोणताही प्रतिबंधात्मक आदेश सार्वजनिक रित्या जाहीर करण्यात आलेला नव्हता, तसेच कोविड संसर्ग पसरविण्याचा कोणताही पुरावा अभियोक्त्याकडे नाही.”

सरकारी पक्षाने दाखल केलेल्या साक्षीदारांपैकी बहुतांश साक्षीदारांनी घटनास्थळी आरोपींनी तोंडाला मास्क अश्याने ओळखता येणार नाही असे सांगितले. त्यामुळे संपूर्ण खटल्याची पायाभरणीच कोसळली.

न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट नमूद केले की, “फक्त जमाव जमला म्हणून संसर्ग फैलावल्याचा आरोप ठरत नाही. प्रतिबंधात्मक आदेशाची सार्वजनिक प्रसिद्धी नसल्याने गुन्हा सिद्ध होत नाही.”

या प्रकरणात आरोपींना कायदेशीर दिलासा मिळवून देण्यात ॲड. आनंद मुजुमदार यांचा युक्तिवाद निर्णायक ठरला.

त्यांच्या काटेकोर मांडणीने न्यायालयीन पातळीवर सत्याला न्याय मिळवून दिला.


या निकालानंतर जळगावातील कायदेशीर वर्तुळात ॲड. मुजुमदार यांच्या युक्तिवादाची जोरदार चर्चा सुरू आहे.ह्यात अँड. महेश जोशी, अँड. अजय जोशी, पल्लवी जोशी यांनी सुद्धा काम पाहिले











